पासपोर्ट भ्रष्टाचारप्रकरणी सीबीआयच्या धाडी; अधिकाऱ्यांसह दलालांवर गुन्हे

पासपोर्ट सेवा केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झाल्याप्रकरणी सीबीआयने शनिवारी मुंबई आणि नाशिक शहरात एकूण ३३ ठिकाणी छापेमारी केली.
पासपोर्ट भ्रष्टाचारप्रकरणी सीबीआयच्या धाडी; अधिकाऱ्यांसह दलालांवर गुन्हे
Published on

मुंबई : पासपोर्ट सेवा केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झाल्याप्रकरणी सीबीआयने शनिवारी मुंबई आणि नाशिक शहरात एकूण ३३ ठिकाणी छापेमारी केली. तसेच सीबीआयने पासपोर्ट अधिकाऱ्यांवर आणि दलालांवर एकूण १२ गुन्हे दाखल केले आहेत.

बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट जारी करून त्या बदल्यात काही एजंटच्या माध्यमातून पासपोर्ट अधिकाऱ्यांच्या अकाऊंटमध्ये थेट पैसे आल्याचे सीबीआयने म्हटले आहे. मुंबईसह नाशिक परिसरात सीबीआयने यासाठी मोठी शोधमोहीम राबवत संशयास्पद कागदपत्रे हस्तगत केली आहेत.

मुंबई, नाशिकमध्ये ३३ ठिकाणी छापेमारी

सीबीआयने शनिवारी मुंबईतील दोन पासपोर्ट सेवा केंद्रांवर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याप्रकरणी मुंबई व नागपूरमधील ३३ ठिकाणी छापे टाकले. या छाप्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे समोर आले आहे. सीबीआयने याप्रकरणी अनेक ‘एफआयआर’ नोंदवले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in