इंद्राणी मुखर्जीवरील माहितीपटाचे प्रसारण थांबवण्याची सीबीआयची याचिका फेटाळली

सीबीआयच्या अर्जात हस्तक्षेप करण्यास नकार देत सक्षम न्यायालयाकडे दाद मागण्याचे निर्देश देत अर्ज फेटाळून लावला.
इंद्राणी मुखर्जीवरील माहितीपटाचे प्रसारण थांबवण्याची सीबीआयची याचिका फेटाळली

मुंबई : शीना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीवर बनवलेल्या द बरीड ट्रुथ या माहितीपटाच्या स्थगितीची मागणी सत्र न्यायालयाने फेटाळून लावली. सीबीआयचे विशेष न्यायाधीश एस. पी. नाईक-निंबाळकर यांनी सीबीआयच्या अर्जात हस्तक्षेप करण्यास नकार देत सक्षम न्यायालयाकडे दाद मागण्याचे निर्देश देत अर्ज फेटाळून लावला.

'इंद्राणी मुखर्जी स्टोरी : द बरीड ट्रुथ' या माहितीपट मालिकेचा प्रीमियर २३ फेब्रुवारी रोजी नेटफ्लिक्सवर होत आहे. या मालिकेमध्ये २५ वर्षीय शीना बोरा बेपत्ता झाल्याचे कथानक दाखवण्यात आले आहे. याला आक्षेप घेत सीबीआयने नेटफ्लिक्सला या प्रकरणाशी संबंधित आरोपी व्यक्ती आणि व्यक्तींना माहितीपटात दाखवण्यावर बंदी घालण्याचे निर्देश जारी करावेत आणि खटल्याची सुनावणी पूर्ण होईपर्यंत ते प्रसारित करू नयेत, अशी विनंती करणारा अर्ज केला दाखल केला. त्या अर्जावर विशेष न्यायाधीश एस. पी. नाईक-निंबाळकर यांच्यासमोर सुनावणी झाली.

इंद्राणीवर तिचा ड्रायव्हर श्यामवर राय आणि माजी पती संजीव खन्ना यांच्या मदतीने एप्रिल २०१२ मध्ये आपली २४ वर्षीय मुलगी शीना बोरा हिची गळा दाबून हत्या केल्याचा आरोप आहे. शीना बोरा हे इंद्राणीचे पूर्वीच्या पतीपासून झालेले अपत्य होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in