जलाशयांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे ;पालिका खर्च करणार ९३ लाख

मुंबईला सात धरणांतून पाणीपुरवठा केला जातो
जलाशयांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे 
;पालिका खर्च करणार ९३ लाख

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणी मुंबईतील जलाशयात साठवण केली जाते. त्यानंतर जलाशयातून मुंबईतील विविध भागात पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे या जलाशयाच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार असून, यासाठी पालिका ९३ लाख रुपये खर्च करणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मुंबईला सात धरणांतून पाणीपुरवठा केला जातो. मुंबईत आलेले मुंबईत ठिकठिकाणी असलेल्या २७ जलाशयात साठवण केले जाते. त्यानंतर जलाशयातून साठवण केलेले पाणी जल वाहिन्याद्वारे पुरवठा करण्यात येतो. या २७ जलाशयांपैकी वांद्रे व जोगेश्वरीपर्यंतच्या परिसराला पाणी पुरवठा करण्यासाठी असलेल्या पाच जलाशयांवर सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यात येणार आहे. वेरावली टेकडी जलाशय क्रमांक १, २, ३ व वेरावली उच्चस्तर जलाशय, पाली टेकडी जलाशय अशा पाच जलाशयांची सुरक्षा व्यवस्था बळकट करण्यासाठी हा निर्णय जल अभियंता विभागाने घेतला आहे. पोलीस उपायुक्त (सुरक्षा) यांनी दिलेल्या स्थळ चाचणी अहवालामध्ये सीसीटिव्ही यंत्रणा बसवण्याबाबत सुचित केले होते. या कामासाठी ९३ लाख रुपये खर्च येणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in