बापरे बाप...मुंबईत युट्यूबरच्या घरातील सीसीटीव्ही हॅक, आई-बहिणीचे न्यूड व्हिडिओ व्हायरल

कुटुंबीयांच्या सुरक्षेसाठी लावलेला सीसीटीव्ही कॅमेरा हॅक केल्याने सर्वत्र एकच खळबळ
बापरे बाप...मुंबईत युट्यूबरच्या घरातील सीसीटीव्ही हॅक, आई-बहिणीचे न्यूड व्हिडिओ व्हायरल
Published on

आजच्या काळात हॅकिंगच्या घटना सर्रास घडत आहेत. कधी कोणी कोणाचा फोन तर कधी कोणाचा लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर हॅक करत आहे, मात्र धक्कादायक बाब म्हणजे आता सीसीटीव्ही कॅमेरे ते देखील मुंबईतील राहत्या घरातील सीसीटीव्ही कॅमेरे हॅक होत असल्याचे समोर आले आहे.

मुंबईतील एका 21 वर्षीय यूट्यूबरला आपल्या घरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणं चांगलंच महागात पडलं आहे. वांद्रे येथील यूट्यूबरच्या घरातील सीसीटीव्ही कॅमेरा हॅक करून त्याच्या आई आणि बहिणीचा न्यूड व्हिडिओ व्हायरल झाल्याची घटना समोर आली आहे. कुटुंबीयांच्या सुरक्षेसाठी लावलेला सीसीटीव्ही कॅमेरा हॅक केल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

वांद्रे येथील २१ वर्षीय यूट्यूबरने मुंबईतील वांद्रे पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली आहे. त्याने त्याच्या घरात सुरक्षेच्या कारणास्तव सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते. मात्र, एका अज्ञात व्यक्तीने हे कॅमेरे हॅक केले आणि यूट्यूबरच्या आई आणि बहिणीचे न्यूड व्हिडिओ व्हायरल केले.

यूट्यूबर तरुणाने पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या मित्राने त्याला कॉल करुन त्याची आई आणि बहिणीचा खाजगी व्हिडिओ(न्यूड) सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचं सांगितलं. यानंतर संबंधित यूट्यूबरला त्याच्या घरातील सीसीटीव्ही कॅमेरा हॅक झाल्याचं लक्षात आलं. या घटनेतील व्हायरल व्हिडिओ हा १७ नोव्हेंबरचा असून यात यूट्यूबरची आई आणि बहिण वेगवेगळ्या वेळी बाथरुममधून नग्न बाहेर पडताना दिसत आहेत. अज्ञात सायबर भामट्याने सीसीटीव्ही कॅमेरे हॅक करुन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला.

यूट्यूबर तरुणाने दाखल केलेल्या तक्रारीवरुन वांद्रे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात IPC च्या कलम 500, 501 आणि IT कलम 66(C),66(E), 67(A) अंतर्गत गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. वांद्रे पोलिसांनी सांगितलं की, हे प्रकरण खुप संवेदनशील असून याचा तपास केला जात आहे. पोलिसांनी संबंधीत आयपी अॅड्रेसचा शोध घेतला आहे, ज्याचा वापर सीसीटीव्ही हॅक करण्यासाठी केला गेला होता. दरम्यान, पोलिसांनी सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला संबंधित व्हायरल व्हिडिओ हटवण्यास आहे.

logo
marathi.freepressjournal.in