आता विक्रोळीत PNG वर आधारित स्मशानभूमी; प्रदूषणमुक्त मुंबईसाठी पालिकेचा निर्णय; १२ कोटी रुपये खर्च

शहरातील वाढते प्रदूषण कमी करायला मुंबई मनपाने पावले टाकायला सुरुवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून विक्रोळी पार्कसाइट स्मशानभूमीत पीएनजी दाहिनी बसवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.
आता विक्रोळीत PNG वर आधारित स्मशानभूमी; प्रदूषणमुक्त मुंबईसाठी पालिकेचा निर्णय; १२ कोटी रुपये खर्च

मुंबई : शहरातील वाढते प्रदूषण कमी करायला मुंबई मनपाने पावले टाकायला सुरुवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून विक्रोळी पार्कसाइट स्मशानभूमीत पीएनजी दाहिनी बसवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.

नवीन स्मशानभूमी बांधली जाणार आहे. त्यात प्रार्थना सभागृह, संगमरवरी दगडाची आसन व्यवस्था, उद्यान असणार आहे. तसेच दोन पीएनजी दाहिनी बसवण्यात येणार असून, यासाठी १२ कोटी ६७ लाख ४ हजार रुपये खर्च करण्यात येणार आहे.

वाढते प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने प्रदूषणमुक्त मुंबईसाठी नियमावली जारी केली. यात स्मशानभूमीत टायर जाळण्यावर बंदी घातली आहे. प्रदूषणमुक्त मुंबईसाठी स्मशानभूमीत विद्युत दाहिनी व पीएनजी दाहिनी बसवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. विक्रोळी पश्चिम पार्कसाइट, वर्षा नगर हिंदू स्मशानभूमीचे बांधकाम करण्यात येणार आहे. २०१५.६५ चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या जागेवर सोईसुविधांसह स्मशानभूमीचे बांधकाम करण्यात येणार आहे.

आणखी एक लाकडी दाहिनी!

परंपरेनुसार आजही अनेक जण अंत्यसंस्कारासाठी लाकडे वापरतात. त्यामुळे स्मशानभूमीत लाकडी दाहिनी असते. विक्रोळी पार्कसाइट येथील प्रस्तावित स्मशानभूमीत तीन लाकडी दाहिन्या आहेत. त्याचबरोबर आणखी एक लाकडी दाहिनी बसवण्यात येणार आहे.

देवनार येथे प्रदूषणमुक्त स्मशानभूमी

स्मशानभूमी प्रदूषणमुक्त करण्यासाठी मुंबई महापालिकेकडून विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. स्मशानभूमी ही प्रदूषणमुक्तीसाठी नैसर्गिक वायूचा वापर करण्यावर भर दिला आहे. देवनार येथील हिंदू स्मशानभूमीत नैसर्गिक वायूचा वापर करून प्रदूषण कमी करण्याच्या उपाययोजना केल्या जात आहेत. ३ वर्षांसाठी ही यंत्रणा बसविण्यात येत आहे. यावर पालिका २१ लाख रुपये खर्च करणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in