सेन्सॉर बोर्डावर भ्रष्टाचाराचे आरोप ६.५० लाख रुपये लाच दिल्याचा अभिनेत्याचा दावा;केंद्राकडून चौकशीचे आदेश

एकाला तीन लाख, तर एकाला साडेतीन लाख रुपये लाच दिल्याचा दावा केला.
सेन्सॉर बोर्डावर भ्रष्टाचाराचे आरोप ६.५० लाख रुपये लाच दिल्याचा अभिनेत्याचा दावा;केंद्राकडून चौकशीचे आदेश

मुंबई : केंद्रीय चित्रपट प्रमाणपत्र मंडळ (सेन्सार बोर्ड) पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. सेन्सॉर बोर्डाने चित्रपट दाखवण्यासाठी व प्रमाणपत्र देण्यासाठी लाच मागितल्याचा गंभीर आरोप दक्षिणी अभिनेते विशाल यांनी केला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल केंद्राने घेतली असून चौकशीचे आदेश दिले आहेत.

अभिनेते विशाल यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकून चित्रपटाला प्रमाणपत्र देण्यासाठी सेन्सॉर बोर्डाने पैशांची मागणी केली. इंडियन फिल्म ॲॅण्ड टेलिव्हिजन डायरेक्टर असोसिएशन व इंडियन मोशन पिक्चर्स असोसिएशनने या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी केली.

विशाल यांनी आरोप केला की, मार्क एंटोनी या चित्रपटाची हिंदी आवृत्ती मंजूर करण्यासाठी मला लाच द्यावी लागली. विशाल यांनी दोन लोकांचे नाव व त्यांच्या बँक खात्याची माहिती दिली. एकाला तीन लाख, तर एकाला साडेतीन लाख रुपये लाच दिल्याचा दावा त्यांनी केला.

या प्रकरणी सेन्सॉर बोर्डाने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र, माहिती-प्रसारण खात्याने चौकशीचे आदेश देऊन सांगितले की, सेन्सॉर बोर्डात भ्रष्टाचाराचा आरोप दुर्दैवी आहे. सरकार भ्रष्टाचाराबाबत कठोर कारवाई करते. या प्रकरणातील संबंधित व्यक्तीवर कडक कारवाई केली जाईल. वरिष्ठ अधिकाऱ्याला या प्रकरणाच्या चौकशीसाठी मुंबईला पाठवले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in