जनगणना पूर्वचाचणी सुरू; अंतर्गत घरयादी, घरगणनेला सुरूवात; १३५ प्रगणक, २२ पर्यवेक्षकांची नेमणूक

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एम पश्चिम विभागात जनगणना -२०२७ पूर्वचाचणी सुरू झाली आहे. पूर्वचाचणीमध्ये घरयादी व घरगणनेची पूर्वचाचणी १० ते ३० नोव्हेंबर या कालावधीत सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये करण्यात येत आहे.
जनगणना पूर्वचाचणी सुरू; अंतर्गत घरयादी, घरगणनेला सुरूवात; १३५ प्रगणक, २२ पर्यवेक्षकांची नेमणूक
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एम पश्चिम विभागात जनगणना -२०२७ पूर्वचाचणी सुरू झाली आहे. पूर्वचाचणीमध्ये घरयादी व घरगणनेची पूर्वचाचणी १० ते ३० नोव्हेंबर या कालावधीत सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये करण्यात येत आहे. पूर्वचाचणी अंतर्गत स्व-गणना करण्याचा पर्यायदेखील १ ते ७ नोव्हेंबर या कालावधीत उपलब्ध करून देण्यात आला होता.

महाराष्ट्र राज्यातील घरयादी व घरगणनेची पूर्वचाचणी निवडक तीन क्षेत्रांमध्ये करण्यात येत आहे. पूर्वचाचणी करिता निवडलेल्या नमुना क्षेत्रांमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एम/पश्चिम विभागातील (अंशतः), जळगाव जिल्ह्यातील चोपडा तहसील (अंशतः) आणि कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तहसील या नमुना क्षेत्रांची निवड करण्यात आली आहे. जनगणना पूर्वचाचणीसाठी जनगणना अधिनियम, १९४८ च्या तरतुदी लागू असणार आहेत.

जनगणना २०२७ ही पूर्णतः डिजिटल माध्यमातून करण्याची सुरूवात झाली आहे. या पूर्वचाचणीमध्ये घरयादी व घरगणना या पहिल्या टप्यातील मध्ये पर्यवेक्षकाद्वारे प्रत्येक घरयादी गटाची चतुःसीमा DLM App च्या माध्यमातून तयार करण्यात येणार आहे.

या चतुःसीमेच्या आत येणा-या सर्व इमारती, घरांची गणना आणि कुटुंबाची माहिती प्रगणकाद्वारे HLO App द्वारे संकलित करण्यात येणार आहे. तसेच CMMS Portal द्वारे क्षेत्रीय कामाचे व्यवस्थापन व देखरेख होणार आहे.

बृहन्मुंबई महापालिकेकरिता महानगरपालिका आयुक्त (प्रधान जनगणना अधिकारी), अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) (अतिरिक्त) प्रधान जनगणना अधिकारी) व कार्यकारी आरोग्य अधिकारी (शहर जनगणना अधिकारी) म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in