महापरिनिर्वाण दिनानिमित्त उद्या मेगाब्लॉकमधून प्रवाशांची सुटका 

लोकल फेऱ्या आणि मेल एक्स्प्रेस गाड्यांचे वेळापत्रक सुरळीत राहावे, यासाठी मध्य आणि हार्बर रेल्वेने ४ डिसेंबर रोजी मेगाब्लॉक न घेण्याचा निर्णय घेतला
महापरिनिर्वाण दिनानिमित्त उद्या मेगाब्लॉकमधून प्रवाशांची सुटका 
ANI
Published on

महापरिनिर्वाण दिनानिमित्त रेल्वे प्रशासनाने येत्या रविवारी तिन्ही मार्गांवर कोणताही मेगाब्लॉक घेणार नसल्याचे जाहीर केले आहे. यामुळे रविवारी मुंबईकरांची मेगाब्लॉकमधून सुटका झाली असून रेल्वेच्या घराबाहेर पडणाऱ्या मुंबईकरांचा प्रवास सुखकर होणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६ डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिन आहे. या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील दादर चौपटीवरील चैत्यभूमीवर लाखो अनुयायी येत असतात. दोन दिवस आदीपासूनच हजारो अनुयायी शिवाजी पार्क परिसरात येऊन राहतात. त्यामुळे या अनुयायांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी राज्य सरकार आणि सर्व सार्वजनिक वाहतूक यंत्रणा प्रयत्नशील आहेत. यामुळे मुंबईत ५ ते ७ डिसेंबरदरम्यान बेस्ट उपक्रमाकडून अतिरिक्त बसफेऱ्या चालवण्यात येणार आहेत. यात लोकल फेऱ्या आणि मेल एक्स्प्रेस गाड्यांचे वेळापत्रक सुरळीत राहावे, यासाठी मध्य आणि हार्बर रेल्वेने ४ डिसेंबर रोजी मेगाब्लॉक न घेण्याचा निर्णय घेतला आहे. 

logo
marathi.freepressjournal.in