संततधार पावसामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक विलंबाने

मुंबईसह महानगरामध्ये बुधवारी सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली.
संततधार पावसामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक विलंबाने

मुंबईत बुधवार सकाळपासून कोसळणाऱ्या संततधार पावसामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील लोकल साधारण १० ते १५ मिनिटे विलंबाने धावत आहेत. कोसळणारा संततधार पाऊस आणि विलंबाने धावणाऱ्या लोकलमुळे मुंबईकरांची एकच तारांबळ उडाली असून अनेकांना कार्यालयात पोहोचण्यास विलंब झाला.

मुंबईसह महानगरामध्ये बुधवारी सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. कोसळणाऱ्या पावसाचा फटका मध्य आणि पश्चिम उपनगरीय सेवेला बसला. जोरदार पावसामुळे लोकल चालवताना मोटरमनला समस्या येत होत्या. त्यामुळे लोकलचा वेग मंदावला. परिणामी, लोकल विलंबाने धावत आहेत. मध्य रेल्वेवरील सीएसएमटी ते कल्याण, कर्जत, कसारा मार्गावरील अप-डाउन लोकल १० ते १५ मिनिटे, सीएसएमटी ते पनवेल, तसेच पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट ते विरार, डहाणू दरम्यानच्या लोकल ५ ते १० मिनिटे विलंबाने धावत आहेत.त्यामुळे लोकल गाड्यांना गर्दी होत असून कामावर जाणाऱ्यांनाही काहीसा उशीर होत आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in