'ऑथेंटिकेशन बायपास'बाबत सतर्क राहा! केंद्र सरकारचे नागरिकांना आवाहन

सायबर गुन्हेगार एआय तंत्रज्ञानाचा वापर करून अतिशय वास्तववादी 'डीपफेक' व्हिडीओ आणि कृत्रिम ओळख तयार करत आहेत. या तंत्रज्ञानाद्वारे फेसियल ऑथेंटिकेशन, लाइव्हनेस व्हेरिफिकेशन आणि व्हिडीओ-केवायसी प्रक्रियेला बगल दिली जात आहे.
'ऑथेंटिकेशन बायपास'बाबत सतर्क राहा! केंद्र सरकारचे नागरिकांना आवाहन
'ऑथेंटिकेशन बायपास'बाबत सतर्क राहा! केंद्र सरकारचे नागरिकांना आवाहन'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

सोमेंद्र शर्मा/मुंबई

केंद्र सरकारने आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (एआय) द्वारे होणाऱ्या 'ऑथेंटिकेशन बायपास' घोटाळ्यांबाबत नागरिकांना एक महत्त्वाचा इशारा दिला आहे. नॅशनल सायबर क्राईम थ्रेट ॲनालिटिक्स युनिटने (एनसीटीएयू) दिलेल्या माहितीनुसार, सायबर गुन्हेगार बनावट व्हिडीओ कॉल्स, खोटी नोकरीची मुलाखत किंवा सोशल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून लोकांचे चेहऱ्याचे रेकॉर्डिंग मिळवून त्यांच्या आर्थिक आणि डिजिटल खात्यांमध्ये अनधिकृत प्रवेश करत आहेत.

सायबर गुन्हेगार एआय तंत्रज्ञानाचा वापर करून अतिशय वास्तववादी 'डीपफेक' व्हिडीओ आणि कृत्रिम ओळख तयार करत आहेत. या तंत्रज्ञानाद्वारे फेसियल ऑथेंटिकेशन, लाइव्हनेस व्हेरिफिकेशन आणि व्हिडीओ-केवायसी प्रक्रियेला बगल दिली जात आहे.

अशी आहे कार्यपद्धती

  • गुन्हेगार सोशल मीडिया, मेसेजिंग ॲप्स, जॉब पोर्टल्स किंवा डेटिंग प्लॅटफॉर्मचा वापर करून लोकांशी संपर्क साधतात.

  • व्हिडीओ कॉल दरम्यान नागरिकांना स्क्रीनकडे पाहणे, मान फिरवणे, डोळ्यांची उघडझाप करणे किंवा बोलण्यास सांगून त्यांचे रेकॉर्डिंग केले जाते.

  • या रेकॉर्डिंगचा वापर एआय टूल्सद्वारे केला जातो. यामुळे गुन्हेगार पीडित व्यक्तीच्या चेहऱ्याची हालचाल, हावभाव आणि आवाजाची हुबेहूब नक्कल करणारा 'डिजिटल रेप्लिका' तयार करतात, ज्याचा वापर आर्थिक खाती उघडण्यासाठी किंवा सक्रिय करण्यासाठी केला जातो.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in