आत्महत्याप्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई
'केंद्रीय अधिकाऱ्या'ची वडाळ्यात आत्महत्या
वडाळ्याच्या अँटॉप हिल परिसरात राहणाऱ्या एका ३६ वर्षीय केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याने रविवारी दुपारी इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली.
मुंबई : वडाळ्याच्या अँटॉप हिल परिसरात राहणाऱ्या एका ३६ वर्षीय केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याने रविवारी दुपारी इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. पंकज केशव हा मानसिक नैराश्येत होता. रविवारी त्याचे कुटुंबीय त्याला मानसिक आजारासाठी पुनर्वसन केंद्रात जाण्यासाठी सांगत होते. मात्र त्याआधीच त्याने आत्महत्येचे पाऊल उचलले, असे अँटॉप हिल पोलिसांनी सांगितले.