मध्य रेल्वेचा गणेशभक्तांना दिलासा! ७९ अतिरिक्त गाड्या चालविण्यात येणार

गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या भाविकांना मध्य रेल्वेने दिलासा दिला आहे. गणपती विशेष ट्रेनव्यतिरिक्त आणखी ७९ विशेष ट्रेन चालविण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस, दिवा आणि पुणे स्थानकांतून या गाड्या चालविण्यात येणार आहेत.
मध्य रेल्वेचा गणेशभक्तांना दिलासा! ७९ अतिरिक्त गाड्या चालविण्यात येणार
Published on

मुंबई : गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या भाविकांना मध्य रेल्वेने दिलासा दिला आहे. गणपती विशेष ट्रेनव्यतिरिक्त आणखी ७९ विशेष ट्रेन चालविण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस, दिवा आणि पुणे स्थानकांतून या गाड्या चालविण्यात येणार आहेत.

ट्रेन क्रमांक ०११६७ एलटीटी सावंतवाडी गाडी रात्री ९ वाजता एलटीटी स्थानकातून सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी सावंतवाडी येथे सकाळी ९.२० वाजता पोहचेल. ही गाडी २२ ते ३१ ऑगस्ट दरम्यान दररोज चालविण्यात येईल. या गाडीच्या दहा फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. तर या गाडीला ६ जनरल डब्बे जोडण्यात येतील. गाडी क्रमांक ०११७१ एलटीटी सावंतवाडी गाडी एलटीटी स्थानकातून सकाळी ८.२० वाजता सुटेल. ही गाडी रात्री ९ वाजता सावंतवाडी स्थानकात पोहचेल. या गाडीच्या १० फेऱ्या चालविण्यात येतील. ही गाडी २२ ते ३१ ऑगस्ट दरम्यान दररोज धावेल.

दिवा स्थानकातून सुटणाऱ्या गाड्या

गाडी क्रमांक ०११५५ दिवा-चिपळूण ही २२ ते ३१ ऑगस्ट या कालावधीत चालविण्यात येणार आहे. सकाळी ७. १५ वाजता दिवा स्थानकातून सुटणारी ही गाडी त्याच दिवशी चिपळूण स्थानकात दुपारी २ वाजता पोहचेल. तसेच गाडी क्रमांक ०११३३ दिवा-खेड गाडी दिवा स्थानकातून दुपारी १.४० वाजता सुटेल. ही गाडी त्याच दिवशी रात्री ८ वाजता खेड स्थानकात पोहचेल.

सीएसएमटी स्थानकातून सुटणाऱ्या गाड्या

गाडी क्रमांक ०११०३ सीएसएमटी-सावंतवाडी ही २२ ते ३१ ऑगस्ट दरम्यान दररोज चालविण्यात येणार आहे. ही गाडी सीएसएमटी स्थानकातून दुपारी ३ वाजून ३० मिनिटांनी सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजता सावंतवाडी येथे पोहचेल. गाडी क्रमांक ०११५१ ही गाडी सीएसएमटी स्थानकातून रात्री १२ वाजून २० वाजता सुटेल. ही गाडी दुपारी २ वाजून २० मिनिटांनी सावंतवाडी येथे पोहचेल. २२ ते ३१ ऑगस्ट या कालावधीत दररोज ही गाडी चालविण्यात येईल.

logo
marathi.freepressjournal.in