Mumbai Local: मध्य रेल्वेवर १४ अतिरिक्त AC लोकल; १६ एप्रिलपासून सेवा सुरू होणार; प्रवाशांना उन्हाळ्यापासून मिळणार दिलासा

वाढत्या उष्णतेने हैराण झालेल्या लोकल प्रवाशांना मध्य रेल्वेने दिलासा दिला आहे. प्रवाशांच्या गारेगार प्रवासासाठी १६ एप्रिलपासून मुख्य मार्गावर १४ अतिरिक्त वातानुकूलित लोकल सुरू करण्यात येणार आहेत.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : वाढत्या उष्णतेने हैराण झालेल्या लोकल प्रवाशांना मध्य रेल्वेने दिलासा दिला आहे. प्रवाशांच्या गारेगार प्रवासासाठी १६ एप्रिलपासून मुख्य मार्गावर १४ अतिरिक्त वातानुकूलित लोकल सुरू करण्यात येणार आहेत.

या लोकलमुळे वातानुकूलित सेवांची संख्या ६६ वरून ८० पर्यंत वाढणार आहे.

नवीन वातानुकूलित सेवा विद्यमान नॉन-एसी सेवांच्या जागी चालवण्यात येतील. त्यामुळे उपनगरीय सेवांची संख्या १,८१० राहील.

या सेवा सोमवार ते शनिवार चालतील, रविवार आणि निर्धारित सुट्टीच्या दिवशी नॉन-एसी रॅकसह संबंधित सेवा सुरू राहणार आहेत.

नवीन वातानुकूलित सेवांचे वेळापत्रक

कल्याण - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सकाळी ७: ३४ वाजता सुटेल.

बदलापूर - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सकाळी १०:४२ वाजता सुटेल

ठाणे - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दुपारी १: २८ वाजता

ठाणे - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - दुपारी ३:३६ वाजता सुटेल.

ठाणे - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल सायंकाळी ५.४१ वाजता

ठाणे - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - सायंकाळी ७: ४९

बदलापूर - ठाणे - रात्री ११:०४ वाजता सुटेल.

डाऊन दिशा (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून)

विद्याविहार - कल्याण सकाळी ६:२६ वाजता सुटेल.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - बदलापूर सकाळी ९:०९ वाजता सुटेल.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - ठाणे लोकल दुपारी १२:२४ वाजता सुटेल

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - ठाणे लोकल दुपारी २:२९ वाजता सुटेल

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - ठाणे लोकल सायंकाळी ४:३८ वाजता सुटेल.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - ठाणे लोकल सायंकाळी ६: ४५ वाजता सुटेल.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते बदलापूर लोकल रात्री ९:०८ मिनिटांनी सुटेल.

logo
marathi.freepressjournal.in