

मुंबई : अभियांत्रिकी व देखभाल कामे करण्यासाठी मध्य रेल्वेने उपनगरीय विभागात रविवारी मेगाब्लॉक घेतला आहे. ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान अप व डाऊन जलद मार्गावर सकाळी १०.४० ते दुपारी ३.४० वाजेपर्यंत ब्लॉक असेल. तर हार्बर मार्गावर पनवेल आणि वाशी स्थानकांदरम्यान ब्लॉक असेल.
ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ९.३४ वाजल्यापासून दुपारी ३.०३ वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद /अर्ध-जलद लोकल गाड्या ठाणे ते कल्याण दरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळविण्यात येतील.
या गाड्या त्यांच्या नियोजित थांब्यांव्यतिरिक्त कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांवर थांबतील आणि त्यांच्या नियोजित वेळेपेक्षा सुमारे १० मिनिटे उशिराने गंतव्य स्थानकावर पोहोचतील.
कल्याण येथून सकाळी १०.२८ वाजल्यापासून दुपारी ३.४० वाजेपर्यंत सुटणाऱ्या अप जलद /अर्ध-जलद लोकल गाड्या कल्याण ते ठाणे दरम्यान अप धीम्या मार्गावर वळविण्यात येतील.