मध्य रेल्वेची फुकट्यांकडून ३ महिन्यात १०३.३९ कोटी रुपयांची वसुली

मध्य रेल्वेने एकट्या जून महिन्यात नोंद न केलेल्या सामानासह तिकीटविरहित/अनियमित प्रवासाच्या ४.८३ लाख प्रकरणांमधून तब्ब्ल ३१.७८ कोटी रुपयांचा महसूल वसूल केला आहे
मध्य रेल्वेची फुकट्यांकडून ३ महिन्यात १०३.३९ कोटी रुपयांची वसुली

मध्य रेल्वेवरील प्रवाशांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. सोईस्कर आणि सुखकर प्रवास म्हणून रेल्वेकडे पाहिले जात असले तरी काही फुकट्या प्रवाशांकडून या सुविधेचा गैरफायदा घेतला जात आहे. विनातिकीट प्रवास करत प्रवाशांकडून रेल्वे प्रवास केला जात असल्याने मध्य रेल्वेने अशा प्रवाशांविरोधात तपासणी मोहीम राबवली आहे. मध्य रेल्वेच्या तिकीट तपासणी पथकाने एप्रिल-जून या कालावधीत तब्ब्ल १०३.३९ कोटी रुपयांचा विक्रमी तिकीट तपासणी महसूल जमा केला आहे.

तिकीटविरहित आणि अनियमित प्रवास रोखण्यासाठी उपनगरीय, मेल एक्सप्रेस, प्रवासी सेवा आणि विशेष गाड्यांमध्ये मध्य रेल्वेकडून तिकीट तपासणी करण्यात येत आहे. यासाठी विशेष पथके मध्य रेल्वेकडून कार्यरत असून या पथकांद्वारे तिकीटविना प्रवास आणि इतर गैरप्रकारांबाबत बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे. दरम्यान, मध्य रेल्वेने एकट्या जून महिन्यात नोंद न केलेल्या सामानासह तिकीटविरहित/अनियमित प्रवासाच्या ४.८३ लाख प्रकरणांमधून तब्ब्ल ३१.७८ कोटी रुपयांचा महसूल वसूल केला आहे. तर मागील ३ महिन्यात एप्रिल-जून कालावधीत तिकीटविरहित/अनियमित प्रवासाची आणि नोंद न केलेल्या सामानाची एकूण १५ लाख प्रकरणे आढळून आली असून याद्वारे प्रशासनाने तब्ब्ल १०३.३९ कोटींची वाढ नोंदवली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in