Mumbai : मध्य रेल्वेला भंगार विक्रीतून १३६.१० कोटींचे उत्पन्न

मध्य रेल्वेने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भंगार विक्रीतून विक्रमी १३६.१० कोटींचे उत्पन्न मिळवले आहे. गेल्या पाच वर्षांतील पहिल्या तिमाहीतील ही सर्वोत्तम कामगिरी आहे. मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत ८९ टक्क्यांची वाढ नोंदवली आहे.
Mumbai : मध्य रेल्वेला भंगार विक्रीतून १३६.१० कोटींचे उत्पन्न
Mumbai : मध्य रेल्वेला भंगार विक्रीतून १३६.१० कोटींचे उत्पन्नसंग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : मध्य रेल्वेने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भंगार विक्रीतून विक्रमी १३६.१० कोटींचे उत्पन्न मिळवले आहे. गेल्या पाच वर्षांतील पहिल्या तिमाहीतील ही सर्वोत्तम कामगिरी आहे. मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत ८९ टक्क्यांची वाढ नोंदवली आहे.

मध्य रेल्वेने सर्व पाच विभाग आणि वर्कशॉपमध्ये 'मिशन झिरो स्क्रॅप स्टेटस' राबवले. या अंतर्गत विविध ठिकाणातील भंगारची नियोजनबद्ध विल्हेवाट लावण्यात आली. विशेषतः दुर्गम आणि विखुरलेल्या ठिकाणांवरील भंगार गोळा करून त्याची विक्री करण्यात आल्याने उत्पन्नात मोठी वाढ झाली. वर्ष २०२६-२७ च्या पहिल्या तिमाहीत मिळालेल्या १३६.१० कोटी रुपयांच्या उत्पन्नाच्या तुलनेत वर्ष २०२५-२६ मध्ये ७१.९४ कोटी, वर्ष २०२४-२५ मध्ये ८१.०९ कोटी, वर्ष २०२३-२४ मध्ये ८१.६४ कोटी आणि वर्ष २०२२-२३ मध्ये १०१.४० कोटी रुपये उत्पन्न मिळाले होते. भंगार विक्रीत मुंबई विभागाने २२.४३ कोटी रुपयांसह अव्वल स्थान पटकावले. त्यापाठोपाठ भुसावळ विभागाने २०.४४ कोटी, नागपूर विभागाने १९.९८ कोटी, पुणे विभागाने १८.१९ कोटी आणि सोलापूर विभागाने ६.४४ कोटी रुपये उत्पन्न मिळवले. तर, परळ आणि माटुंगा वर्कशॉपसह इतर शेड्स व युनिट्सनी मिळून ४८.६२ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले.

झिरो स्क्रॅप मिशनला चालना

रेल्वे परिसरातील वापरात नसलेले छप्पर, पडिक खांब, रेल्वे रुळ, मोठ्या-मोठ्या यंत्रणाचे नादुरुस्त भाग भंगारात विक्री केले जातात. भंगार साहित्य पडून राहिल्याने अस्वच्छता पसरते आणि तेथील जागा अडून राहिते. त्यामुळे शून्य भंगार मोहिमेतून भंगार उचलले जात आहे. रेल्वे रुळांवरील जुने स्लीपर, लोह, स्टील, अॅल्युमिनियम, पितळ, तांबे व इतर धातूचे भंगार, सेवाबाह्य डबे आणि मालवाहू डबे तसेच इतर टाकाऊ साहित्याची नियोजनबद्ध विक्री करण्यात आली. भंगार विक्रीतील ही विक्रमी कामगिरी मध्य रेल्वेच्या 'झिरो स्क्रॅप मिशन', आर्थिक शिस्त, कार्यक्षम संसाधन व्यवस्थापन आणि पर्यावरणपूरक उपक्रमांप्रती असलेल्या बांधिलकीचे प्रतीक असल्याचे प्रशासनाने सांगितले.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in