मध्य रेल्वेची मालवाहतुकीतून ४,११७ कोटींची कमाई

मध्य रेल्वेने चालू आर्थिक वर्षातील एप्रिल ते सप्टेंबर २०२६ या सहा महिन्यांत मालवाहतुकीतून ४,११७.०७ कोटी रुपयांचा महसूल मिळवला आहे.
मध्य रेल्वेची मालवाहतुकीतून ४,११७ कोटींची कमाई
मध्य रेल्वेची मालवाहतुकीतून ४,११७ कोटींची कमाई'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on: 

मुंबई : मध्य रेल्वेने चालू आर्थिक वर्षातील एप्रिल ते सप्टेंबर २०२६ या सहा महिन्यांत मालवाहतुकीतून ४,११७.०७ कोटी रुपयांचा महसूल मिळवला आहे. या कालावधीत १५,६५२ मालगाड्यांच्या रेकद्वारे ४१.१० दशलक्ष टन मालाची वाहतूक करण्यात आली. गेल्या आर्थिक वर्षातील याच कालावधीच्या तुलनेत मालवाहतुकीत सुमारे १० टक्के, तर महसुलात सहा टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, सप्टेंबर महिन्यात गेल्या दहा वर्षांतील सर्वाधिक ६.५९ दशलक्ष टन मालवाहतुकीची नोंद झाली.

गेल्या वर्षी एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत १४,६२५ रेकद्वारे ३७.३७ दशलक्ष टन मालाची वाहतूक झाली होती. यंदा रेकच्या संख्येत १,०२७ ने वाढ झाली आहे. मागील वर्षी याच कालावधीत मालवाहतुकीतून ३,८७४.३५ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. यंदा ते वाढून ४,११७.०७ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. विभागनिहाय आकडेवारीनुसार, नागपूर विभागाने २४.२६ दशलक्ष टन मालाची वाहतूक करून एकूण मालवाहतुकीत ५९ टक्के वाटा उचलला. यातून २,४६२.२७ कोटींचा महसूल मिळाला.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in