भंगार विक्रीतून मध्य रेल्वे मालामाल! वर्षभरात ३०० कोटींचा टप्पा पार; भंगार विक्रीचा टप्पा गाठणारी मध्य रेल्वे ठरली पहिलीच

विविध प्रकारच्या भंगाराची विल्हेवाट लावण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत.
भंगार विक्रीतून मध्य रेल्वे मालामाल! वर्षभरात ३०० कोटींचा टप्पा पार; भंगार विक्रीचा टप्पा गाठणारी मध्य रेल्वे ठरली पहिलीच

मुंबई : ‘मिशन झिरो’अंतर्गत भंगार विक्रीतून मध्य रेल्वेच्या तिजोरीत वर्षभरात तब्बल ३००.४३ कोटींचा महसूल जमा झाला आहे. जानेवारी ते डिसेंबर २०२३ अखेरपर्यंत भंगार विक्रीत ३०० कोटींचा टप्पा पार करणारी मध्य रेल्वे पहिली ठरली आहे.

मध्य रेल्वेने आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी ३०० कोटींचे भंगार विक्रीचे उद्दिष्ट पार करत ३००.४३ कोटी मिळवले आहेत. एप्रिल ते डिसेंबर-२०२३ या कालावधीतील विक्रीच्या उद्दिष्टापेक्षा ३२.२३ टक्के वाढ झाली आहे.

मध्य रेल्वेने भंगार विक्रीला प्राधान्य देत जुने इंजिन्स, अतिरिक्त डिझेल इंजिन, वापरात नसलेले जुने रेल्वे रूळ तसेच जुने आणि अपघाती इंजिन किंवा डब्बे यासह विविध प्रकारच्या भंगाराची विल्हेवाट लावण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत.

मध्य रेल्वेने असा गाठला टप्पा

भुसावळ विभागाने ५९.१४ कोटी रुपयांची भंगार विक्रीचे लक्ष गाठले

माटुंगा डेपोकडून ४७.४० कोटी रुपयांची भंगार विक्री

मुंबई विभागाची ४२.११ कोटी रुपयांची भंगार विक्री

पुणे विभागाची ३२.५१ कोटी रुपयांची भंगार विक्री

भुसावळच्या इलेक्ट्रिक लोको शेड डेपोने २७.२३ कोटी रुपयांची भंगार विक्री केली

सोलापूर विभागाची २६.७३ कोटी रुपयांची भंगार विक्री

नागपूर विभागाची २४.९२ कोटी रुपयांची भंगार विक्री

मध्य रेल्वेची अन्य ठिकाणी एकत्रितपणे ४०.३९ कोटींची भंगार विक्री

अशी केली भंगार विक्री

रेल्वेचे एकूण २२,३४३ मेट्रिक टन, २३ इंजिन, २५२ डब्बे, आणि १४४ मालवाहू वॅगन (भुसावळ विभागातील १२ किमी जामनेर-पाचोरा सेक्शन नॅरो गेज रुळांसह)

logo
marathi.freepressjournal.in