
मुंबई : लोको, डिझेल सरप्लस लोको, अ-ऑपरेशनल रेल्वे लाईन्स, जुनाट अथवा अपघाती लोको / कोच असे भंगार साहित्याची विक्री करण्यात आली. या भंगारातून एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांत मध्य रेल्वेच्या तिजोरीत तब्बल १५०.८१ कोटींची कमाई झाली. त्यामुळे मध्य रेल्वेने सुरू केलेले 'झिरो स्क्रॅप' मिशन सक्सेस होत असल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
मध्य रेल्वे प्रशासनाने भंगार साहित्यामुळे निर्माण होणारा अडथळा लक्षात घेता 'झिरो स्क्रॅप' मिशन हाती घेतले आहे. झिरो स्क्रॅप मिशन अंतर्गत एप्रिल ते ऑगस्टपर्यंत मेट्रिक टन रुळ, लोकोमोटिव्ह, कोच, वॅगन्स अशा विविध भंगार साहित्याची विक्री केली आहे. झिरो स्क्रॅप मिशन अंतर्गत सुरू केलेल्या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने ३१ ऑगस्टपर्यंत १५०.८१ कोटी रुपयांची भंगार विक्री केली आहे. विशेष म्हणजे, रेल्वे बोर्डाच्या प्रो-रेटाउद्दीष्टाच्या तुलनेत ऑगस्ट २०२३ पर्यंत ३७.१० टक्के उल्लेखनीय वाढ झाली आहे.
'झिरो स्क्रॅप' मिशन अंतर्गत सर्व विभाग आणि डेपोंना भंगार मुक्तीसाठी मध्य रेल्वे ठाम आहे. त्यामुळे रेल्वे बोर्डाचे २०२३-२४ वर्षासाठी ३०० कोटी रुपयांचे उद्दिष्ट ओलांडले आहे.
या भंगार साहित्याची विक्री
६०८६ मेट्रिक टन रूळ, ९ लोकोमोटिव्ह, १६० कोच, आणि ६१ वॅगन्स,
'या' डेपोतून भंगार साहित्याची विक्री
-माटुंगा डेपोत २७.१२ कोटींची भंगार विक्री
-मुंबई विभाग २५.९७ कोटींची भंगार विक्री
-भुसावळ विभाग २२.२५ कोटी रुपयांची भंगार विक्री
-पुणे विभाग १६.०८ कोटींची भंगार विक्री
-भुसावळच्या इलेक्ट्रिक लोको शेड डेपोने १६.०५ कोटींची विक्री
-सोलापूर विभाग ११.३६ कोटींची विक्री
-नागपूर विभाग १०.०७ कोटींची विक्री
-इतर ठिकाणांनी २१.९१ कोटींची भंगार विक्री