मध्य रेल्वेवर आज मेगाब्लॉक; CSMT - विद्याविहार स्थानकांदरम्यान अप व डाउन मार्गावर दुरुस्ती

अभियांत्रिकी व देखभाल दुरुस्तीची कामे करण्यासाठी मध्य रेल्वेने उपनगरीय मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक घेतला आहे. मुख्य मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते विद्याविहार स्थानकांदरम्यान अप व डाऊन धीम्या मार्गावर सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत ब्लॉक असेल.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

मुंबई : अभियांत्रिकी व देखभाल दुरुस्तीची कामे करण्यासाठी मध्य रेल्वेने उपनगरीय मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक घेतला आहे. मुख्य मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते विद्याविहार स्थानकांदरम्यान अप व डाऊन धीम्या मार्गावर सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत ब्लॉक असेल.

मुख्य मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.४८ ते दुपारी ३.४५ या वेळेत सुटणाऱ्या डाउन धीम्या मार्गावरील सेवा सीएसएमटी ते विद्याविहार स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावरून चालविण्यात येतील.

या गाड्या भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील व पुढे विद्याविहार स्थानकावरून पुन्हा डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. घाटकोपर येथून सकाळी १०.१९ ते दुपारी ३.५२ या वेळेत सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील सेवा विद्याविहार आणि सीएसएमटी स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकांवर थांबतील.

पनवेल - वाशी स्थानकांदरम्यान ब्लॉक

हार्बर मार्गावर पनवेल आणि वाशी स्थानकांदरम्यान अप व डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात आला आहे. हार्बर मार्गावर पनवेल आणि वाशी स्थानकांदरम्यान अप व डाउन हार्बर मार्गांवर सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ वाजेपर्यंत ब्लॉक असेल. ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील सेवा पनवेल येथून सीएसएमटीकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ या वेळेत सुटणाऱ्या सेवा तसेच सीएसएमटी येथून पनवेल बेलापूरकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ या वेळेत सुटणाऱ्या सेवा रद्द राहतील. पनवेल येथून ठाणेकडे जाणाऱ्या अप ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवा सकाळी ११.०२ ते दुपारी ३.५३ या वेळेत सुटणाऱ्या सेवा तसेच ठाणे येथून पनवेलकडे जाणाऱ्या डाउन ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवा सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० या वेळेत सुटणाऱ्या सेवा रद्द राहतील. तर ब्लॉक कालावधीत सीएसएमटी आणि वाशी स्थानकांदरम्यान विशेष लोकल गाड्या चालवण्यात येणार आहेत. ब्लॉक कालावधीत ठाणे आणि वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवा उपलब्ध राहतील. तसेच ब्लॉक कालावधीत बेलापूर नेरुळ आणि उरण स्थानकांदरम्यान पोर्ट मार्गावरील सेवा उपलब्ध राहतील.

logo
marathi.freepressjournal.in