

मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने हार्बर मार्गावर रविवार ७ जून रोजी मेगा ब्लॉक घेतला आहे. तर ६ जूनच्या मध्यरात्री मुख्य मार्गावर सीएसएमटी ते विद्याविहार स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गांवर ब्लॉक आहे. या ब्लॉकमुळे शनिवारी रात्री धीम्या मार्गावरून रात्री ११.१६ वाजता सुटणारी टिटवाळा लोकल शेवटची असणार आहे. ब्लॉक कालावधीत काही उपनगरीय सेवा रद्द राहणार असून अनेक गाड्या जलद मार्गावरून वळवण्यात येणार आहेत.
मध्य रेल्वेने मुख्य मार्गावर ६ जूनच्या मध्यरात्री सीएसएमटी ते विद्याविहार स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गांवर रात्री १२.०५ ते पहाटे ५.०५ या वेळेत विशेष ब्लॉक घेतला आहे. या कालावधीत सीएसएमटीहून सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील गाड्या सीएसएमटी ते विद्याविहारदरम्यान जलद मार्गावरून चालविण्यात येतील. तसेच घाटकोपरहून सीएसएमटीकडे येणाऱ्या अप धीम्या मार्गावरील गाड्यांनाही विद्याविहार ते सीएसएमटीदरम्यान जलद मार्गावर वळविण्यात येणार आहे.