

मुंबई : अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मध्य रेल्वेने उपनगरीय विभागावर रविवारी मेगाब्लॉक घेतला जाईल.
मुख्य मार्गावर माटुंगा ते मुलुंड स्थानकादरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गांवर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.४५ पर्यंत ब्लॉक घेण्यात आला आहे, तर ट्रान्स हार्बर मार्गावरही ब्लॉक घेतला आहे.
सीएसएमटीहून सकाळी १०.३६ ते दुपारी ३.१० पर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील सेवा माटुंगा स्थानकावर डाउन धीम्या मार्गावर वळवल्या जातील, तर ठाण्यापलीकडे जाणाऱ्या जलद गाड्या मुलुंड स्थानकावर डाऊन जलद मार्गावर पुन्हा वळवल्या जातील. ठाणे येथून सकाळी ११.०३ ते दुपारी ३.३८ पर्यंत सुटणाऱ्या अप जलद मार्गाच्या सेवा मुलुंड स्थानकावर थांबतील आणि मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान थांबतील, तर माटुंगा स्थानकावर पुन्हा अप जलद मार्गावर वळवल्या जाणार आहेत. ट्रान्स-हार्बर मार्गावर ठाणे आणि वाशी/नेरूळ स्थानकांदरम्यानच्या अप आणि डाऊन मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत ब्लॉक घेतला आहे. त्यामुळे ठाणे येथून सकाळी १०.३५ ते दुपारी ४.०७ पर्यंत सुटणाऱ्या वाशी, नेरूळ, पनवेलसाठीच्या डाऊन मार्गावरील सेवा आणि पनवेल/नेरूळ/वाशी आणि ठाण्यासाठीच्या लोकल सकाळी १०.२५ ते दुपारी ४.०९ पर्यंत सुटणाऱ्या अप मार्गावरील सेवा रद्द राहतील.
