

मुंबई : अभियांत्रिकी व देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी मध्य रेल्वेने उपनगरीय मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेतला आहे. मुख्य मार्गावर ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात आला आहे. तर पनवेल आणि वाशी स्थानकांदरम्यान अप व डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात आला आहे. ब्लॉक कालावधीत अनेक अप मेल/एक्सप्रेस गाड्या कल्याण व ठाणे स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत.
हार्बर मार्गावर पनवेल आणि वाशी स्थानकांदरम्यान ब्लॉक
पनवेल आणि वाशी स्थानकांदरम्यान अप व डाउन हार्बर मार्गावर (पोर्ट मार्ग वगळून) सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात आला आहे. ब्लॉक कालावधीत पनवेल येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा १०.३३ ते १५.४९ वाजेदरम्यान सुटणाऱ्या सेवा तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून पनवेल /बेलापूरकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ वाजेदरम्यान सुटणाऱ्या सेवा रद्द राहतील. पनवेल येथून ठाणेकडे जाणाऱ्या अप ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवा सकाळी ११.०२ ते दुपारी ३.५३ वाजेदरम्यान सुटणाऱ्या सेवा तसेच ठाणे येथून पनवेलकडे जाणाऱ्या डाउन ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवा सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० वाजेदरम्यान सुटणाऱ्या सेवा रद्द राहतील. तसेच ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई - वाशी दरम्यान विशेष लोकल गाड्या चालविण्यात येतील. ब्लॉक कालावधीत ठाणे -वाशी/नेरूळ स्थानकांदरम्यान ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवा उपलब्ध राहतील. ब्लॉक कालावधीत बेलापूर/नेरूळ आणि उरण स्थानकांदरम्यान पोर्ट मार्गावरील सेवा उपलब्ध राहतील.