Mumbai : मध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक

विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मध्य रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सीएसएमटी मुंबई आणि विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ पर्यंत ब्लॉक असेल.
(संग्रहित छायाचित्र)
(संग्रहित छायाचित्र)एएनआय
Published on

मुंबई : विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मध्य रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सीएसएमटी मुंबई आणि विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ पर्यंत ब्लॉक असेल. तर सीएसएमटी- चुनाभट्टी/वांद्रे डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.४० ते सायंकाळी ४.४० पर्यंत आणि चुनाभट्टी/वांद्रे- सीएसएमटी अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० पर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे.

ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.४८ ते दुपारी ३.४५ पर्यंत सुटणाऱ्या डाउन धीम्या सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवल्या जातील. या लोकल भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील. यानंतर पुढे विद्याविहार स्थानकावर डाऊन धीम्या मार्गावर वळवल्या जातील. घाटकोपर येथून सकाळी १०.१९ ते दुपारी ३.५२ पर्यंत विद्याविहार आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर लोकल चालवल्या जातील. या लोकल कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकांवर थांबतील. तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-चुनाभट्टी/वांद्रे डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.४० ते सायंकाळी ४.४० पर्यंत आणि चुनाभट्टी/वांद्रे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० पर्यंत ब्लॉक असेल. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/वडाळा रोड येथून सकाळी ११.१६ ते सायंकाळी ४.४७ पर्यंत वाशी/ बेलापूर/ पनवेलला जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि सीएसएमटी येथून सकाळी १०.४८ ते दुपारी ४.४३ पर्यंत वांद्रे/गोरेगाव येथे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.

पश्चिम रेल्वे मार्गावर ३६ तासांचा ब्लॉक

पश्चिम रेल्वे मार्गावरील कांदिवली यार्ड येथील एलिव्हेटेड बुकिंग ऑफिस तोडण्यासाठी शनिवारी (ता.३१) दुपारी २ ते रविवारी मध्यरात्री १ वाजेपर्यंत पाचव्या मार्गावर आणि यार्ड मार्गावर ३६ तासांचा मोठा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत उपनगरीय आणि मेल एक्स्प्रेस गाड्या फास्ट मार्गावर चालवल्या जातील.

ब्लॉकमुळे काही गाड्या अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत. ३० आणि ३१ मे २०२५ रोजी सुरू होणारी ट्रेन क्रमांक १९४१८ अहमदाबाद-बोरिवली एक्स्प्रेस वसई रोडपर्यंत धावेल. तसेच ३१ मे आणि १ जून २०२५ रोजी सुरू होणारी ट्रेन क्रमांक १९४२५ बोरिवली-नंदुरबार एक्स्प्रेस भाईंदर येथून सुटेल. ३१ मे २०२५ रोजी सुरू होणारी ट्रेन क्रमांक १९४२६ नंदुरबार-बोरिवली एक्स्प्रेस वसई रोड येथे थांबेल. तसेच १ जून २०२५ रोजी सुरू होणारी ट्रेन क्रमांक १९४१७ बोरिवली-अहमदाबाद एक्स्प्रेस प्रवास वसई रोड येथून सुटेल. त्याचप्रमाणे या ब्लॉकमुळे, काही उपनगरीय गाड्या रद्द करण्यात येणार आहेत.

पनवेल ते कुर्ला दरम्यान विशेष सेवा
पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणाऱ्या अप हार्बर लाईन सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी १०.४५ ते संध्याकाळी ४.१३ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे जाणाऱ्या अप हार्बर लाईन सेवा बंद राहतील. तर ब्लॉक काळात पनवेल ते कुर्ला (प्लॅटफॉर्म क्रमांक ८) दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील. ब्लॉक काळात हार्बर लाईनवरील प्रवाशांना सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.०० पर्यंत मेन लाईन आणि पश्चिम रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
logo
marathi.freepressjournal.in