मध्य रेल्वेवर आज 'पॉवर ब्लॉक'; काही लोकल फेऱ्या रद्द, कर्जत यार्ड रिमॉडेलिंगचे काम करणार

मध्य रेल्वेमार्फत कर्जत यार्ड रिमॉडेलिंगच्या कामासाठी गुरुवारी सकाळी ११ ते दुपारी १.३० वाजेपर्यंत विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे नेरळ आणि खोपोली स्थानकांदरम्यान लोकल सेवा उपलब्ध राहणार नाही. काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.
मध्य रेल्वेवर आज 'पॉवर ब्लॉक'; काही लोकल फेऱ्या रद्द, कर्जत यार्ड रिमॉडेलिंगचे काम करणार
Published on

मुंबई : मध्य रेल्वेमार्फत कर्जत यार्ड रिमॉडेलिंगच्या कामासाठी गुरुवारी सकाळी ११ ते दुपारी १.३० वाजेपर्यंत विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे नेरळ आणि खोपोली स्थानकांदरम्यान लोकल सेवा उपलब्ध राहणार नाही. काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

कर्जत यार्ड रिमॉडेलिंगच्या कामासाठी मध्य रेल्वेने विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेतला आहे. या ब्लॉकमध्ये एनआय-पूर्व ओएचई कामे, पोर्टल उभारणी, अँकर शिफ्टिंग, लोड ट्रान्सफर आणि नवीन क्रॉसिंग पॉइंट्सची कामे करण्यात येणार आहेत.

ब्लॉकमुळे डाउन मार्गावरील ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. खोपोलीहून कर्जतला जाणारी दुपारी १२ वाजताची लोकल रद्द करण्यात आली आहे. तसेच खोपोलीहून कर्जतला जाणारी दुपारी १:१५ वाजताची लोकल रद्द करण्यात आली आहे. तर अप मार्गावरील खोपलीहून सकाळी ११.२० वाजता सुटणारी कर्जत लोकल रद्द करण्यात आली आहे. तर खोपोलीहून दुपारी १२:४० वाजता सुटणारी कर्जत लोकल रद्द करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सीएसएमटीहून सकाळी ९:३० ते सकाळी ११.१४ पर्यंत कर्जतला जाणाऱ्या उपनगरीय ट्रेन नेरळ स्थानकात शॉर्ट टर्मिनेशन करण्यात येणार आहेत. या गाड्या नेरळ आणि कर्जत दरम्यान रद्द राहतील.

एक्सप्रेसवर होणार परिणाम

ब्लॉक कालावधीत ११०१४ कोइम्बतूर-एलटीटी एक्सप्रेस सकाळी ११.३० ते दुपारी १.०५ पर्यंत लोणावळा येथे नियंत्रित केली जाईल. तसेच २२९१९ चेन्नई-अहमदाबाद हमसफर एक्सप्रेस आणि १२१६४ चेन्नई-एलटीटी सुपरफास्ट एक्सप्रेस पुणे विभागात नियंत्रित केली जाणार आहे. तसेच नेरळ आणि खोपोली स्थानकांदरम्यान उपनगरीय सेवा उपलब्ध राहणार नाहीत.

logo
marathi.freepressjournal.in