‘गो शून्य’ या स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने वाडीबंदरमध्ये मध्य रेल्वेचा प्रकल्प

धोक्यात आलेल्या फुलपाखरांच्या प्रजातींचे संवर्धन आणि संरक्षण करण्याचा हा एक सकारात्मक प्रयत्न
‘गो शून्य’ या स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने वाडीबंदरमध्ये मध्य रेल्वेचा प्रकल्प

मध्य रेल्वेने पर्यावरणाला हातभार लावण्यासाठी विविध उपक्रम राबवले आहेत. अनेक हरित उपक्रम राबवत असतानाच वाडीबंदर येथे फुलपाखरू उद्यानाची संकल्पना मुंबई विभागात मध्य रेल्वेने प्रथमच पूर्णत्वास नेली आहे. ‘गो शून्य’ या एनजीओच्या समन्वयाने मुंबई विभागाने वाडीबंदरमधील पूर्वीच्या डंपिंग ग्राउंडला फुलपाखरे आकर्षित करण्यासाठी विशिष्ट प्रजातीच्या फुलांच्या सुंदर बागेत रूपांतरित केले आहे. धोक्यात आलेल्या फुलपाखरांच्या प्रजातींचे संवर्धन आणि संरक्षण करण्याचा हा एक सकारात्मक प्रयत्न असल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे.

मुंबईत फुलपाखरांच्या १५० प्रजाती आढळतात. अन्न उत्पादन चक्रातील एक महत्त्वाचा घटक म्हणून फुलपाखरू ही निसर्गाची सर्वोत्तम रंगीत निर्मिती आहे. यांचेच पुनर्वसन व्हावे आणि फुलपाखरांच्या प्रजातीचे संवर्ध व्हावे यासाठी मध्य रेल्वेने वाडीबंदर येथे फुलपाखरू उद्यानाची संकल्पना मुंबई विभागात राबवली आहे. याठिकाणी उभारण्यात आलेल्या उद्यानात फुलपाखरांसाठी अनेक देशी आणि सुवासिक प्रजातींच्या वनस्पतीचा अधिवास आहे.

हे फुलपाखरू उद्यान निसर्गप्रेमींसाठीही एक पर्वणी असून उद्यानात जेट वॉटरिंग सुविधादेखील आहे. तर हरित वसुंधरेच्या दिशेने केलेल्या योगदानाचा एक भाग म्हणून मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि इगतपुरी येथे हर्बल गार्डन्स आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे मियावाकी फॉरेस्टची निर्मिती केली आहे.

२००० चौरस फूट क्षेत्रफळात पसरलेले उद्यान

सुमारे २००० चौरस फूट क्षेत्रफळात पसरलेल्या वाडीबंदर येथील नवीन कोचिंग कॉम्प्लेक्सजवळ असलेल्या या बटरफ्लाय गार्डनमध्ये डार्क ब्लू टायगर (तिरुमाला लिम्नियास), ब्लू मॉर्मन, टाउनी राजा (कॅरेक्‍सेस बर्नार्डस), स्ट्रीप्ड टायगर (डॅनॉस जेन्युटिया), ऑर्किड टिट, कॉमन जेझेबेल (डेलियास युकेरिस), टॉनी कोस्टर (अक्रेआ व्हायोले) आणि प्रतिबंधित स्पॉटेड आणि फ्लॅट अशा ४०० हून अधिक प्रजातींच्या वनस्पतींचा संग्रह आहे. चंपा, जास्वंद, तगर, अनंता, मोगरा, कणेर, लंटाना, जमैकन स्पाइन, कामिनी, लिली, अबोली इत्यादी वनस्पतींच्या प्रजाती फुलपाखरांना आकर्षित करण्यासाठी ओळखल्या जातात.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in