कळवा स्थानकाजवळ ओव्हरहेड वायर तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतून विस्कळीत ; प्रवाशांचे हाल

मध्य रेल्वेकडून याबाबत कोणतीही माहिती दिली जात नसल्याने प्रवाशामध्ये गोंधळ निर्माण झाला आहे.
File Photo
File Photo

ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे कामावरुन घरी जाणाऱ्या प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. लोकल सेवा विस्कळीत झाल्याने रेल्वे स्थानकात गर्दी उसळली आहे. मध्य रेल्वेकडून याबाबत कोणतीही माहिती दिली जात नसल्याने प्रवाशामध्ये गोंधळ निर्माण झाला आहे.

ठाण्यातील कळवा स्थानकाजवळ ओव्हर हेड वायर तुटल्याने त्याचा परिणाम लोकल सेवेवर झाला आहे. दुपारी दोन-अडीच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती आहे. सायंकाळी झाली असली तरी देखील मध्ये रेल्वेची सेवा अद्याप विस्कळीतच आहे. गोरखपूर एक्स्प्रेस आणि बदलापूर लोकल डाऊन फास्ट ट्रॅकवर रखडली आहे. बिघाड दुरुस्तीची काम अजूनही सुरुच असून त्यामुळे कल्याण दिशेने जाणाऱ्या सर्व लोकल एक्स्प्रेस स्लो मार्गावरुन वळवल्या आहेत.

ठाण्यातील कळवा रेल्वे स्थानकाच्या अंतरावर पारसिक बोगद्याच्या ठिकाणी ओव्हरहेड वायर तुटली आहे. त्यामुळे कर्ज कसाराकडे जाणाऱ्या जलद मार्गावरील लोकल वाहतूक खोळंबली आहे. यामुळे जलद मार्गावरील लांब पल्ल्याच्या आणि लोकल ट्रेनला मोठा धक्का बसला आहे. गेल्या दोन तासांपासून वाहतुकीवर याचा परिणाम झाला आहे. ठाण्यावरुन कर्जत कसाराकडे जाणाऱ्या लोकल धीम्या मार्गावरुन वळवण्यात आल्या आहेत. लोकल ट्रेन जवळपास २० ते ३० मिनिटे उशिराने धावत असल्याची माहिती आहे.

ऐन गर्दीच्या वेळी लोकल वाहतून सेवा विस्कळीत झाल्याने अनेकांचे हाल होत आहेत. प्रवाशांना यामुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे. मध्य रेल्वेकडून याबाबत प्रसारमाध्यमांना देखील माहिती देण्यात आली नाही. त्याशिवाय ट्वीटरवर देखील कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. मध्ये रेल्वेने शेवटचं ट्वीट हे दुपारी १.१२ वाजण्याच्या सुमारास केलं आहे. यात त्यांनी दिवाळी, छठ पूजा निमित्ताने लावण्यात येणाऱ्या साईनगर शिर्डी ते बिकानेर दरम्यानच्या विशेष ट्रेनची माहिती दिली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in