सिग्नल बिघाड झाल्यामुळे मध्य रेल्वेच्या सेवेचे तीनतेरा

कोपर रेल्वे स्थानकाजवळ गवताला आग लागल्याने रेल्वे मार्गाजवळील सिग्नल केबलचे नुकसान झाले.
सिग्नल बिघाड झाल्यामुळे मध्य रेल्वेच्या सेवेचे तीनतेरा

मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील उपनगरीय सेवेचा रविवारी बोजवारा उडाला. दोन ठिकाणी सिग्नलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ५० लोकलवर परिणाम झाला. रविवारी माटुंगा ते ठाणेदरम्यान अप व डाऊन धीम्या गती मार्गावर सकाळी ११.०५ ते दु. ३.३५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक होता. सिग्नलमध्ये पहिला तांत्रिक बिघाड २.४५ वाजता अप जलदगती मार्गावर कांजूरमार्ग ते विक्रोळीदरम्यान झाला. त्यामुळे सीएसएमटीला जाणाऱ्या लोकल दीड तास अडकून पडल्या होत्या. हा बिघाड ५.१५ वाजता दुरुस्त करण्यात आला. त्यानंतर सेवा सुरळीत झाला, तर सिग्नलमध्ये दुसरा बिघाड कोपर रेल्वे स्थानकाजवळ सायंकाळी ६.१५ वाजता झाला. कोपर रेल्वे स्थानकाजवळ गवताला आग लागल्याने रेल्वे मार्गाजवळील सिग्नल केबलचे नुकसान झाले. त्यामुळे तीन सिग्नल नादुरुस्त झाले.

logo
marathi.freepressjournal.in