तिकीट तपासणीसांना सहकार्य करा अन्यथा...

तिकीट तपासनीस आणि प्रवाशांमध्ये कायम वेगवेगळ्या कारणांवरून वाद होतात. यामध्ये विनातिकीट प्रवाशाला पकडल्यास दंड भरण्यास टाळाटाळ करताना प्रवासी आणि टीसी यांच्यामध्ये...
तिकीट तपासणीसांना सहकार्य करा अन्यथा...

उपनगरीय रेल्वे मार्गावर विनातिकीट प्रवाशांना शिस्त लावण्यासाठी तिकीट तपासणीसांचे भरारी पथक रेल्वे स्थानकांवर, पादचारी पूल, रेल्वे डब्यात दिसून येते. मात्र तिकीट तपासनीस आणि प्रवाशांमध्ये कायम वेगवेगळ्या कारणांवरून वाद होतात. यामध्ये विनातिकीट प्रवाशाला पकडल्यास दंड भरण्यास टाळाटाळ करताना प्रवासी आणि टीसी यांच्यामध्ये वाद उफाळून येतो. दरम्यान, चालू गाडीत तिकीट तपासण्याचे अधिकार नसल्याचे सांगत एका प्रवाशाने तिकीट दाखविण्यास नकार दिल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत असून दुसऱ्या बाजूला व्हिडिओला प्रतिसाद देताना 'तिकीट तपासणीसांना सहकार्य करा अन्यथा कारवाई केली जाईल असा सज्जड दम मध्य रेल्वेकडून देण्यात आल्याचे दिसून येत आहे.

उपनगरीय रेल्वे मार्गावर वाढत्या गर्दीचा गैरफायदा घेत अनेक प्रवासी विनातिकीट प्रावास करत आहेत. अशा फुकट्या प्रवाशांना रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून तिकीट तपासणीसांच्या विशेष पथकाकडून कारवाई करण्यात येत आहे. मात्र रेल्वे स्थानकांवरील प्रवासी अनेकदा तिकीट तपासणीसांशी गैरवर्तन करतात. नुकताच सोशल मीडियावर एका प्रवाशाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये सरकारच्या नियमानुसार चालू रेल्वे गाडीत तिकीट तपासण्याची परवानगी नाही. माझ्याकडे पास आहे, पण मी तो दाखविणार नाही असे प्रवासी व्हिडिओमध्ये म्हणत आहे. या व्हिडिओला प्रतिसाद देताना अशा फुकट्या प्रवाशांना चांगलाच दम भरला आहे. मध्य रेल्वेच्या विभागीय वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापकांनी तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांना सहकार्य करा, एखाद्या प्रवाशाने तपासणीसाला सहकार्य न केल्यास त्यांच्यावर कारवाई होऊ शकते असे स्पष्ट करत ताकीद दिली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in