फुकट्या प्रवाशांच्या मुसक्या आवळल्या; ४६.२६ प्रकरणांत ३०० कोटींचा दंड वसूल

विनातिकीट अंतरापेक्षा अधिकचा प्रवास, मेल एक्स्प्रेसमधून सामान घेऊन जाण्यासाठी बुकींग न करणे कायद्याने गुन्हा आहे, अशी उद्घोषणा मध्य रेल्वेच्या हद्दीत वारंवार केली जाते. तरीही विना तिकीट अंतरापेक्षा अधिकचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढतच आहे.
फुकट्या प्रवाशांच्या मुसक्या आवळल्या; ४६.२६ प्रकरणांत ३०० कोटींचा दंड वसूल

मुंबई : विनातिकीट, अंतरापेक्षा अधिकचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर मध्य रेल्वेने दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ (एप्रिल २०२३ ते मार्च-२०२४) दरम्यान, मध्य रेल्वेने विनातिकीट, अनियमित प्रवास आणि बुक न केलेल्या सामानाच्या ४६.२६ लाख प्रकरणांत दंडात्मक कारवाई करत ३०० कोटी रुपयांचा महसूल मध्य रेल्वेच्या तिजोरीत जमा झाला आहे. दरम्यान, गेल्या वर्षभरात केलेल्या कारवाईत मुंबई विभाग अग्रेसर असल्याचे मुंबई विभागाच्या मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

विनातिकीट अंतरापेक्षा अधिकचा प्रवास, मेल एक्स्प्रेसमधून सामान घेऊन जाण्यासाठी बुकींग न करणे कायद्याने गुन्हा आहे, अशी उद्घोषणा मध्य रेल्वेच्या हद्दीत वारंवार केली जाते. तरीही विना तिकीट अंतरापेक्षा अधिकचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढतच आहे. फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यासाठी मध्य रेल्वेच्या माध्यमातून विशेष मोहीम हाती घेण्यात येते. या मोहिमेअंतर्गत ४६.२६ प्रकरणात ३०० कोटींचा दंड वसूल करण्यात आल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.

मध्य रेल्वेने २६५.९७ कोटी महसुलाच्या बाबतीत या वर्षीचे लक्ष्य १२.८० टक्के ओलांडले आहे. तसेच एकूण ४२.६३ लाख प्रकरणांमध्ये ८.३८ टक्के लक्ष्य पार केले असून, प्रकरण आणि कमाईच्या बाबतीत सर्व विभागामध्ये प्रथम क्रमांकावर आहे.

तिकीट निरीक्षकांचा १ कोटींचा टप्पा पार!

मध्य रेल्वेकडे दोन महिला वरिष्ठ तिकीट परीक्षकाचा समावेश असून २२ तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. ज्यांनी तिकीट तपासणीच्या उत्पन्नात वैयक्तिकरीत्या १ कोटी रुपयांपेक्षा जास्त योगदान दिले आहे.

logo
marathi.freepressjournal.in