१८ तास कामाचा सल्ला देणाऱ्या सीईओने मागितली माफी

लोकांनी संताप व्यक्त करताच पहिल्या पोस्टबद्दल त्यांच्यावर माफी मागण्याची वेळ आली आहे
१८ तास कामाचा सल्ला देणाऱ्या सीईओने मागितली माफी

रडगाणे सांगू नका, १८ तास काम करा’, असा सल्ला देणारा एका बड्या कंपनीचा सीईओ सोशल मीडियावर ट्रोल झाला. त्यानंतर या सीईओवर माफी गाण्याची वेळ आली. आधी त्यांनी लिंक्‍डइनवर नवख्या तरुणांनी कसे १८ तास झोकून काम करायला हवे यावर बराच मोठा लेख लिहिला होता. त्यानंतर ते सोशल मीडियावर ट्रोल झाले.

तरुणांना दिवसाचे १८ तास काम करण्याचा सल्ला बॉम्बे शेव्हिंग कंपनीचे सीईओ शांतनू देशपांडे यांनी लिंक्डइनवरून दिला. त्यानंतर लोकांनी संताप व्यक्त करताच पहिल्या पोस्टबद्दल त्यांच्यावर माफी मागण्याची वेळ आली आहे.

शांतनू देशपांडे यांनी त्यांच्या एका लिंक्डइन पोस्टमध्ये लिहिले आहे की, जर तुम्ही २२ वर्षांचे असाल आणि कंपनीत नवीन असाल तर तुम्ही स्वतः त्या नोकरीमध्ये झोकून दिलं पाहिजे. चांगले खा आणि तंदुरुस्त राहा, पण किमान ४-५ वर्षे दररोज १८ तास काम करत राहा. कामाची पूजा करा पण त्यावरून रडत राहू नका.

तरुणांना ऑनलाईन सगळ्या गोष्टी अगदी सहज उपलब्ध होतात. कुटुंब आणि काम यामधील संतुलन राखा. कुटुंबासोबत वेळ घालवणे महत्वाचं वाटतं एवढ्या लवकर हे सगळं करण्याची गरज नाही, असे शांतनू यांचे म्हणणे आहे. करिअरच्या पहिल्या ५ वर्षांत तुम्हाला जे मिळाले ते आयुष्यभरासाठी खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे जीव ओतून काम केले पाहिजे, असे त्यांचे म्हणणे आहे.

या लेखामुळे युजर्सनी शांतनू यांना ट्रोल केले आहे. नोकरी करणारे लोक आपल्या बॉसचे गुलाम होतील. त्यामुळे बॉस फक्त श्रीमंत होईल असेही एका युजरने म्हटलं आहे. अशा लोकांमुळे गुलामी करणाऱ्यांची एक नवीन जनरेशन तयार होईल. अनेक युजर्सनी त्यांना यावरून प्रश्नही केले आहेत. अखेर सगळ्यांचा संताप पाहून शांतनू यांना माफी मागावी लागली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in