मुंबई : ज्येष्ठ कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या पत्नीने दाखल केलेल्या तक्रारीनंतर एडलवाईज फायनान्शियल सर्व्हिसेसचे अध्यक्ष राशेश शहा, एडलवाईज ॲॅसेट रिकन्स्ट्रक्शन ॲॅसेट कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व सीईओ राजकुमार बन्सल यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आपल्यावरील गुन्हे रद्द करावेत, अशी मागणी त्यांनी याचिकेद्वारे न्यायालयात केली आहे.
नितीन देसाई यांच्या पत्नी नैना देसाई यांनी एडलवाईज कंपनीविरोधात तक्रार दाखल केली. यात शहा, बन्सल यांच्याबरोबरच जितेंद्र कोठारी व अन्य दोघांविरोधात तक्रार दाखल केली.
ज्येष्ठ वकील अमित देसाई यांनी न्या. नितीन सांब्रे व न्या. आर. एन. लढ्ढा यांच्या खंडपीठापुढे या प्रकरणाची तात्काळ सुनावणी करण्याची विनंती केली. पैसे परत मिळवण्यासाठी शहा व बन्सल यांनी अधिकृत प्रक्रिया राबवली आहे. या प्रकरणी तपासाला स्थगिती मिळावी व माझ्या अशिलांविरोधात कोणतीही कारवाई करू नये, असे आदेश पोलिसांना द्यावेत.