चैत्यभूमीतील सोयीसुविधांसाठी सज्जता; महापरिनिर्वाण दिनासाठी BMC ची तयारी

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६९ वा महापरिनिर्वाण दिन येत्या ६ डिसेंबर २०२५ रोजी आहे. या अनुषंगाने चैत्यभूमी आणि छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून पुरविण्यात येणाऱ्या नागरी सेवासुविधांमध्ये कोणतीही कमतरता राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी संबंधित अधिकारी आणि खात्यांना दिले आहेत.
चैत्यभूमीतील सोयीसुविधांसाठी सज्जता; महापरिनिर्वाण दिनासाठी BMC ची तयारी
चैत्यभूमीतील सोयीसुविधांसाठी सज्जता; महापरिनिर्वाण दिनासाठी BMC ची तयारी
Published on

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६९ वा महापरिनिर्वाण दिन येत्या ६ डिसेंबर २०२५ रोजी आहे. या अनुषंगाने चैत्यभूमी आणि छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून पुरविण्यात येणाऱ्या नागरी सेवासुविधांमध्ये कोणतीही कमतरता राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी संबंधित अधिकारी आणि खात्यांना दिले आहेत.

बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने चैत्यभूमीवर लाखोंचा जनसमुदाय सहभागी होतो. या अनुयायांना आवश्यक त्या सर्व नागरी सोयीसुविधा योग्यप्रकारे मिळतील, यासाठी महानगरपालिकेचे सर्व अधिकारी-कर्मचारी आणि सर्व संबंधितांनी विशेष खबरदारी घ्यावी व सजगतेने कार्यतत्पर राहून नेमून दिलेली कार्ये वेळेत पूर्ण करावीत, अशा सूचनाही गगराणी यांनी दिल्या. तसेच चैत्यभूमीसह संबंधित परिसरांमध्ये सर्व सोयीसुविधा पुरविण्यास बृहन्मुंबई महानगरपालिका कटिबद्ध असल्याचे गगराणी यांनी नमूद केले. महापरिनिर्वाण दिन पूर्वतयारीबाबत आढावा बैठकीदरम्यान ते बोलत होते.

महानगरपालिकेद्वारे दादर येथील चैत्यभूमी व शिवाजी पार्क मैदान परिसरात अधिक दर्जेदार सेवासुविधा पुरविण्यात येतील. आवश्यकता असेल त्या ठिकाणी अधिक प्रमाणात सेवासुविधांचे नियोजन करण्याचेही निर्देश त्यांनी बैठकीदरम्यान संबंधितांना दिले. तसेच सर्व यंत्रणांनी आपापसात सुयोग्य समन्वय साधून कार्यवाही करावी, अधिकाधिक प्रभावीपणे सेवासुविधा उपलब्ध होईल.

....अशी असेल सुविधा

चैत्यभूमी स्मारक, तोरणा प्रवेशद्वार, अशोक स्तंभ, भीमज्योत व परिसराची रंगरंगोटी, उद्यान परिसराचे सुशोभीकरण, अभिवादनाकरिता पुष्पचक्र, टेहळणी मनोरा, नियंत्रण कक्ष, भागोजी कीर स्मशानभूमी येथे अनुयायांच्या रांगेकरिता दुतर्फा पडदे, स्थळ निर्देशक फुगा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुर्मीळ छायाचित्रांचे प्रदर्शन, रांगेतील अनुयायांसाठी तात्पुरते छत व आसन व्यवस्था, पोलीस खात्यामार्फत शासकीय मानवंदना, पुष्पवृष्टी, माहिती पुस्तिकेचे प्रकाशन व वितरण, अनुयायांकरिता तात्पुरत्या स्वरूपात जल प्रतिबंधक (वॉटरप्रुफ) निवासी मंडप, चैत्यभूमी व छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क) परिसरात माहिती व दिशादर्शक फलक लावणे, मैदानामध्ये धूळ-प्रतिबंधक व्यवस्था, स्वच्छतेची व्यवस्था, वैद्यकीय सेवा-सुविधा, भोजन मंडपाची व्यवस्था, मा. भंतेजींकरिता ध्यान साधना शिबिर कक्ष, पिण्याच्या शुद्ध पाण्याची व्यवस्था, फिरत्या शौचालयांची व्यवस्था, विद्युत व्यवस्था, अग्निशमन दल व्यवस्था, भ्रमणध्वनी (मोबाईल) चार्जिंग सुविधा इत्यादी बाबींची माहिती सपकाळे यांनी दिली.

logo
marathi.freepressjournal.in