मालमत्ता कर वसुली पालिकेसाठी चॅलेंज; वर्षभरात फक्त ८६३ कोटींची वसुली

गेल्या चार वर्षांत पालिकेने मालमत्ता करात वाढ केलेली नाही. पालिकेच्या या निर्णयाला राज्य सरकारने ही ५ फेब्रुवारी रोजी मंजुरी दिली आहे.
मालमत्ता कर वसुली पालिकेसाठी चॅलेंज; वर्षभरात फक्त ८६३ कोटींची वसुली

मुंबई : मालमत्ता कर मुंबई महापालिकेच्या उत्पन्नाचे मुख्य स्रोत. परंतु ५०० चौरस फुटाखालील घरांना कर माफी, नवीन मालमत्ता कर वाढीला स्थगिती यामुळे पुढील महिनाभरात ४,५०० कोटींचे लक्ष गाठणे पालिकेसाठी चॅलेंज झाले आहे. दरम्यान, मार्च २०२३ ते जानेवारी २०२४पर्यंत फक्त ८६३ कोटी रुपये मालमत्ता करापोटी पालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहेत.

गेल्या चार वर्षांत पालिकेने मालमत्ता करात वाढ केलेली नाही. पालिकेच्या या निर्णयाला राज्य सरकारने ही ५ फेब्रुवारी रोजी मंजुरी दिली आहे. लवकरच अध्यादेश निघाल्यानंतर पालिकेला मागील बिल काढता येणार आहे. परंतु डिसेंबर महिन्यात ऑनलाईन पद्धतीने देयके वितरित करण्यास सुरुवात केली; मात्र ही १५ ते २० टक्के वाढीची देयके असल्यामुळे त्यास राजकीय पक्षांकडून मोठ्या प्रमाणावर विरोध झाला. त्यामुळे मालमत्ता कर वसुलीचे उद्दीष्ट गाठणे पालिकेसाठी जिकिरीचे झाले आहे.मालमत्ता कर वसुली पालिकेसाठी चॅलेंज महिनाभरात ४,५०० कोटींचे उद्दिष्ट गाठणे कठीणच फेब्रुवारी अखेरपर्यंत नवीन देयके मिळणार

२०२३-२४ चे सुधारित लक्ष्य ४,५०० कोटी

जानेवारी २०२४ पर्यंत वसुली

८६३ कोटी

२०२४-२५ चे लक्ष्य

४,९५० कोटी

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in