चलो स्मार्ट कार्ड व मोबाइलवर तिकीट व बसपास उपलब्ध होणार

बसेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रवास अंतरावर आधारीत ‘सुपर सेव्हर’ बसपास उपलब्ध आहेत
चलो स्मार्ट कार्ड व मोबाइलवर तिकीट व बसपास उपलब्ध होणार

प्रवाशांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबर चलो स्मार्ट कार्ड व मोबाइलवर तिकीट व बस पास उपलब्ध होणार आहे ‘चलो’ या मोबाइल अॅप या प्रणालीअंतर्गत इलेक्ट्रॉनिक तिकीट इश्युइंग मशीनमध्ये रोख रकमेच्या सहाय्याने नियमित तिकीट व बसपास वितरणाबरोबरच, ‘चलो’ स्मार्टकार्ड आणि मोबाइलच्या माध्यमातून तिकीट व दैनंदिन बसपास उपलब्ध करण्यात आल्याचे बेस्ट उपक्रमाच्या जनसंपर्क विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.

बसेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रवास अंतरावर आधारीत ‘सुपर सेव्हर’ बसपास उपलब्ध आहेत. तसेच उपक्रमाच्या संपूर्ण बसप्रवर्तनावर अमर्याद प्रवासाची सुविधा असलेले ‘मॅजिक’ बसपासदेखील उपलब्ध करण्यात आलेले आहेत. शिवाय दैनंदिन प्रवासाकरिता अमर्याद प्रवासाची सुविधा असलेला सर्वसाधारण बसमार्गांवर ५० रुपये आणि वातानुकूलित बसमार्गांवर ६० रुपयांचा बसपास उपलब्ध करण्यात आलेला आहे. सद्य:स्थितीत हे दोन्ही बसपास रोख पैसे दिल्यावर बस वाहकाकडील ईटीआयएममधून मिळणार आहे.

१५ ऑगस्ट २०२२पासून दैनंदिन बसपासचे वितरण ‘चलो’ मोबाइल अॅप आणि ‘चलो’ स्मार्टकार्डच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. याअंतर्गत प्रवाशांनी ‘चलो’ मोबाइल अॅपची सुविधा घेऊन त्याद्वारे मोबाइलच्या माध्यमातून दैनंदिन बसपास प्रवाशांना उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच ज्या प्रवाशांना ‘चलो’ मोबाइल अॅपच्या माध्यमातून ही सुविधा घ्यावयाची नसेल त्यांना ‘चलो’ स्मार्टकार्डच्या माध्यमातून ही सुविधा प्रवाशांना मिळणार आहे. उपक्रमाच्या बसगाड्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी दैनंदिन बसपास वितरणातील या बदलाची नोंद घेऊन दैनंदिन प्रवासाकरिता ‘चलो स्मार्टकार्डचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in