
पूर्व आणि पश्चिम हवेच्या प्रवाहामुळे वातावरणात आर्द्रता आणि कोरडी हवा राहणार असल्याने रविवार व सोमवारी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. यासोबत आणखी काही वातावरणीय बदल झाल्यास पाऊस बरसणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. यंदा राज्यभरात थंडीचा जोर कमी राहिला असला, तरी पावसाने मात्र वर्षभरात हजेरी लावली. त्यामुळे मुंबईकरांची चांगलीच तारांबळ उडाली. मार्चच्या पहिल्या शनिवार व रविवारी दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून, वातावरणात आणखी काही बदल झाल्यास पाऊस बरसणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.