राज्यात गारपिटीची शक्यता

राज्यात गारपिटीची शक्यता

अरबी समुद्रात मालदीव ते उत्तर महाराष्ट्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे हवामानात हा बदल झाला आहे.

मुंबई : राज्याच्या अनेक भागांत २३ ते २७ नोव्हेंबरच्या कालावधीत अवकाळी पावसासह गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. या पाच दिवसांपैकी रविवार व सोमवार (२६ आणि २७ नोव्हेंबरला) नंदुरबार, धुळे, जळगांव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पावसाची अधिक शक्यता आहे. तसेच या भागात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. बुधवारी २९ नोव्हेंबरपासून वातावरण निवळून कमाल तापमानात घट जाणवून काहीसा गारवा जाणवू शकतो. शुक्रवार, ८ डिसेंबरपासून किमान तापमानातही हळूहळू घसरण होऊन थंडीला सुरुवात होऊ शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. अरबी समुद्रात मालदीव ते उत्तर महाराष्ट्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे हवामानात हा बदल झाला आहे.

logo
marathi.freepressjournal.in