Mumbai Rain Alert : पुढील चार तासांत मुंबईसह ठाणे शहरात मुसळधार पावसाची शक्यता

मुंबईत मुसळधार, तर ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली
Mumbai Rain Alert : पुढील चार तासांत मुंबईसह ठाणे शहरात मुसळधार पावसाची शक्यता

गेल्या दोन दिवसांपासून मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत कोसळणाऱ्या पावसाने गुरुवारी काहीशी विश्रांती घेतली. मात्र रायगड जिल्ह्यांत पाऊस सुरूच होता. दरम्यान, शुक्रवारी मुंबईत मुसळधार, तर ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

त्यानुसार शुक्रवारी मुंबई शहर आणि उपनगरात पावसाने हजेरी लावली. दरम्यान, पुढील चार तासांत मुंबईसह ठाणे शहरात मुसळधार पावसाची शक्यता आहे.


घाटकोपर, विक्रोळी, चेंबूर, साकीनाका परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. असल्फा मेट्रो स्थानकाबाहेर पाणी साचल्याने चित्र समोर येत आहे. दरम्यान, येत्या तीन ते चार तासांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडत आहे. 

logo
marathi.freepressjournal.in