राज्यात सोमवारपासून पावसाची शक्यता

राज्यात सोमवारपासून पावसाची शक्यता

राज्यात १५ ऑगस्टनंतर पावसाची स्थिती सुधारण्याची शक्यता वर्तवली जात आहे

मुंबई : मुंबईसह राज्यात गेले काही दिवस पावसाने दिलेली ओढ आणखी काही दिवस कायम राहील. मात्र, १३ ऑगस्टनंतर पावसाला अनुकूल वातावरण निर्माण होईल, अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे. सध्या मुंबई आणि राज्यात मध्यम किंवा किरकोळ स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यात १३ ऑगस्टनंतर पुन्हा पावसासाठी योग्य वातावरण निर्माण होऊ शकते. त्यानंतर कोकण आणि गोव्यात मध्यम स्वरूपाचा, तर पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. राज्यात १५ ऑगस्टनंतर पावसाची स्थिती सुधारण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in