उल्हासनगरमध्ये कचऱ्याच्या वजनात फेरफार! लढा कामगार संघटनेचे पालिका प्रशासन आणि कोणार्क कंपनीवर आरोप

लढा कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप गायकवाड यांनी उल्हासनगर महापालिकेतील अधिकारी आणि कोणार्क एन्व्हायरो या कंपनीच्या विरोधात गंभीर आरोप केले आहेत.
उल्हासनगरमध्ये कचऱ्याच्या वजनात फेरफार! लढा कामगार संघटनेचे पालिका प्रशासन आणि कोणार्क कंपनीवर आरोप

उल्हासनगर : उल्हासनगर शहरातील विविध कामे करण्यासाठी पालिकेने कोणार्क कंपनीला कंत्राट दिले आहे; मात्र ही कंपनी नेहमी शहरात वादाच्या भोवऱ्यात असते, लढा कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप गायकवाड यांनी उल्हासनगर महापालिकेतील अधिकारी आणि कोणार्क एन्व्हायरो या कंपनीच्या विरोधात गंभीर आरोप केले आहेत.

उल्हासनगर शहरात दररोज ४०० मेट्रिक टन कचरा हा जमा होत असल्याचे उल्हासनगर महानगरपालिका आणि कोणार्क कंपनी सांगत असते; मात्र प्रत्यक्षात संपूर्ण शहरात २०० मेट्रिक टन इतकाच कचरा हा जमा होतो आणि उर्वरित २०० मेट्रिक टन कचरा हा रस्त्यावरील माती उचलून त्याचे वजन केले जात असल्याचा आरोप संदीप गायकवाड यांनी केला आहे, पालिका प्रशासन आणि कोणार्क कंपनीच्या या मिलीभगतचा पर्दाफाश करण्यासाठी गुरुवारी दुपारी संदीप गायकवाड यांनी आपल्या सहकाऱ्यांसह डम्पिंग ग्राऊंड येथे धडक दिली, त्यावेळी बऱ्याच कचरा वाहतूक करणाऱ्या गाड्यांमध्ये माती आणि दगडी दिसून आली. त्यानंतर हिललाईन पोलीस ठाण्याच्या समोर देखील कचरा वाहतूक करणाऱ्या तीन गाड्या संदीप गायकवाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अडवल्या. त्यात देखील माती आणि दगडी असल्याचे उघडकीस आले. यावेळी वाहनचालकाने देखील ही माती डम्पिंग ग्राऊंड येथे टाकण्यासाठी जात असल्याचे सांगितले.

आरोपांमध्ये तथ्य नाही; आयुक्तांचे स्पष्टीकरण

या सर्व आरोपांविषयी पालिका आयुक्त अजीज शेख यांना विचारले असता त्यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत यात कोणतेही तथ्य नसल्याचे सांगितले आहे. तसेच या सर्व गाड्यांवर लक्ष ठेवण्यासाठी अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली एक कमिटी नेमण्याचे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in