पश्चिम रेल्वेवरील सहा लोकल फेऱ्यांच्या वेळेत बदल

पश्चिम रेल्वेवरील सकाळी ८.०१ वाजता सुटणारी विरार-चर्चगेट लोकल आता सकाळी ७.५५ वाजता सुटेल.
पश्चिम रेल्वेवरील सहा लोकल फेऱ्यांच्या वेळेत बदल

मुंबई : पश्चिम रेल्वेवरील सहा लोकल फेऱ्यांच्या वेळेत ४ जानेवारीपासून बदल केला आहे. या लोकलच्या वेळेत काही मिनिटांचा बदल केला असून, प्रवाशांना नेहमी लोकल पकडण्यासाठी पुन्हा वेळेत गणित बसवावे लागणार आहे. पश्चिम रेल्वेवरील सकाळी ८.०१ वाजता सुटणारी विरार-चर्चगेट लोकल आता सकाळी ७.५५ वाजता सुटेल.

सकाळी ७.५६ वाजता सुटणारी विरार-चर्चगेट लोकल सकाळी ७.५९ वाजता सुटेल. सकाळी ६.४० वाजता सुटणारी चर्चगेट-विरार लोकल सकाळी ६.३२ वाजता सुटेल. सकाळी ९.२७ वाजता सुटणारी चर्चगेट-बोरिवली लोकल सकाळी ९.१९ वाजता सुटेल. सकाळी ९.१९ वाजता सुटणारी लोकल सकाळी ९.२३ वाजता सुटेल. सकाळी ९.२४ वाजता सुटणारी चर्चगेट-बोरिवली लोकल सकाळी ९.२७ वाजता सुटेल, अशी माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in