गणपती विसर्जनाची गर्दी टाळण्यासाठी मेगा ब्लॉकमध्ये असणार 'हा' बदल

ब्लॉक कालावधीत धीम्या मार्गावरील लोकल फेऱ्या जलद मार्गावरून धावणार आहेत. काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून
गणपती विसर्जनाची गर्दी टाळण्यासाठी मेगा ब्लॉकमध्ये असणार 'हा' बदल
ANI

रविवार ३ सप्टेंबर रोजी ५ दिवसांच्या गणरायाचे विसर्जन होणार आहे. याच पार्श्वभूमीवर उपनगरीय रेल्वे मार्गावर होणारी गर्दी टाळण्यासाठी मध्य रेल्वेने मुख्य आणि हार्बर मार्गावरील ब्लॉक रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तर पश्चिम रेल्वेवर सांताक्रूझ ते गोरेगावदरम्यान रविवारी ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही लोकल फेऱ्या विलंबाने धावणार आहेत.

पश्चिम रेल्वे
कुठे - सांताक्रूझ ते गोरेगाव अप आणि डाऊन धीम्या मार्गावर
कधी - सकाळी १० ते दुपारी ३

ब्लॉक कालावधीत धीम्या मार्गावरील लोकल फेऱ्या जलद मार्गावरून धावणार आहेत. काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून, काही लोकल फेऱ्या विलंबाने धावतील. विलेपार्ले स्थानकात लोकलला दुहेरी थांबा देण्यात येणार आहे. राम मंदिर स्थानकात फलाट नसल्याने जलद मार्गावरील लोकल थांबणार नाहीत.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in