किशोरी पेडणेकर यांच्यावर आरोपपत्र दाखल करू नये - उच्च न्यायालय

एसआरए घोटाळाप्रकरणी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला
किशोरी पेडणेकर यांच्यावर आरोपपत्र दाखल करू नये -  उच्च न्यायालय
Published on

एसआरए घोटाळाप्रकरणी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. याप्रकरणी किशोरी पेडणेकर यांच्यावर आरोपपत्र दाखल करू नये, असे निर्देश उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिले आहेत. त्यामुळे किशोरी पेडणेकर यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.


वरळी येथील झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पातील सदनिका लाटल्याचा केल्याचा आरोप किशोरी पेडणेकर यांच्यावर झाल्याने मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांच्या अडचणीत वाढ झाली. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध कागदपत्रांच्या आधारे हा आरोप केला होता. याच आरोपावरून आता किशोरी पेडणेकर यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली. किरीट सोमय्या यांनी सांगितले की, किशोरी पेडणेकर यांच्याविरुद्ध कलम ४२०, ४१९, ४६५, ४६८, ४७१ नुसार झोपडपट्टीतील रहिवाशांच्या घरांवर कब्जा केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

logo
marathi.freepressjournal.in