शेअर बाजारात नुकसान झाले म्हणून चार्टर्ड अकाऊंटंटचे अपहरण

पैशांच्या वसुलीसाठी एका चार्टर्ड अकाऊंटटचे पवईतून अपहरण करून त्याच्या सुटकेसाठी पाच कोटींची मागणी केल्याप्रकरणी चौघांना पवई पोलिसांनी अटक केली.
शेअर बाजारात नुकसान झाले म्हणून चार्टर्ड अकाऊंटंटचे अपहरण

मुंबई : पैशांच्या वसुलीसाठी एका चार्टर्ड अकाऊंटटचे पवईतून अपहरण करून त्याच्या सुटकेसाठी पाच कोटींची मागणी केल्याप्रकरणी चौघांना पवई पोलिसांनी अटक केली. अमोल परशुराम म्हात्रे, निरंजन इंद्रमोहन सिंग, विधीचंद्र गयाप्रसाद यादव आणि मोहम्मद सुलेमान ऊर्फ सुलेमान मोहम्मद मोनीब शेख अशी या चौघांची नावे आहेत. अटकेनंतर या चौघांनाही अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या कारवाईत पोलिसांनी एक कार, मोबाईल फोन आणि दोन लॅपटॉप आदी मुद्देमाल जप्त केला आहे.

शेअर मार्केटमध्ये कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याने आरोपीने हा गुन्हा केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

मेघा अरोरा ही महिला पवईतील रेहजा नेस्ट, लेक होम्स कॉम्प्लेक्समध्ये राहते. १७ जानेवारीला तिचे पती भूषण अरोरा हे कामावर जातो, असे सांगून घरातून निघून गेले; मात्र दुसऱ्या दिवसापर्यंत ते घरी परतले नाही. भूषणचा मोबाईल बंद होता, त्यामुळे त्यांच्याशी तिचा काहीही संपर्क होऊ शकला नाही. या घटनेने ती प्रचंड घाबरली आणि तिने पवई पोलिसांत भूषणच्या मिसिंगची तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी मिसिंगची नोंद करून तपास सुरू केला होता. याच दरम्यान मेघाला तिच्याच पतीच्या मोबाईलवरून एका अज्ञात व्यक्तीने फोन करून तिच्या पतीचे अपहरण झाले आहे. त्याच्या सुटकेसाठी पाच कोटीची मागणी केली होती. ही माहिती तिने पवई पोलिसांना सांगितली. भूषण अरोराचे पैशांसाठी अपहरण झाल्याचे उघडकीस येताच त्याची पोलिसांनी गंभीर दखल घेत तपासाला सुरुवात केली होती.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in