चांगला परताव्याचे आमिष दाखवून ५० ते ६० जणांची फसवणूक

फर्ममधये सुमारे ८० लाखांची गुंतवणूक केली होती
चांगला परताव्याचे आमिष दाखवून ५० ते ६० जणांची फसवणूक

मुंबई : गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून ५० ते ६० जणांकडून सुमारे साडेसहा कोटी रुपये घेऊन फसवणूक झाल्याचा प्रकार चेंबूर परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी पती-पत्नीविरुद्ध टिळकनगर पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. राजीव कांतीलाल गोगरी आणि प्रिती राजीव गोगरी अशी या दोघांची नावे असून, ते दोघेही अमृत मार्केटिंग पार्टनरशीप फर्मचे संचालक आहेत. यातील तक्रारदार महिलेची सुमारे ऐंशी लाखांची फसवणूक झाल्याने तिने पोलिसांत तक्रार केली, त्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आल्याचे पोलिसांनी सांगितले. दिपा कामथ ही महिला चेंबूर येथे राहत असून, एका खासगी बँकेत सॉफ्टवेअर प्रोग्राम इंजिनिअर म्हणून कामाला असून, काही वर्षांपूर्वी तिची कांतीलाल गोगरी व त्यांचा मुलगा राजीव गोगरीशी ओळख झाली होती. या ओळखीनंतर त्यांनी त्यांच्या मालकीचे अमृत मार्केटिंग पार्टनरशीप नावाची एक फर्म असून, त्याचे कार्यालय चेंबूर येथील छेडानगर येथे असल्याचे सांगितले होते. ही फर्म विविध ग्राहक उत्पादने वितरीत करण्याचे काम असून फर्मच्या वाढीसाठी त्यांना पैशांची गरज आहे. फर्ममध्ये गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना वाषिक नऊ व्याजदर देण्याचे आमिष दाखविले होते. त्यांच्यावर विश्‍वास ठेवून दिपाने स्वतसह पती आणि मुलीच्या नावाने २००५ ते २०१७ या कालावधीत या फर्ममधये सुमारे ८० लाखांची गुंतवणूक केली होती. जुलै २०१७ नंतर फर्मने परवाता देणे अचानक बंद केले होते. विविध कारण सांगून ते त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in