६३ लाखांच्या हिऱ्यांचा अपहार करून व्यापाऱ्याची फसवणूक

या ६५ वर्षांच्या वयोवृद्ध हिरे दलालाविरुद्ध बीकेसी पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरू केला आहे.
६३ लाखांच्या हिऱ्यांचा अपहार करून व्यापाऱ्याची फसवणूक

मुंबई : सुमारे ६३ लाख रुपयांच्या हिऱ्यांचा अपहार करून एका हिरे व्यापाऱ्याची फसवणूक झाल्याचा प्रकार वांद्रे येथील बीकेसी परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी अरविंद जैन ऊर्फ कासलीवाल या ६५ वर्षांच्या वयोवृद्ध हिरे दलालाविरुद्ध बीकेसी पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरू केला आहे.

नरेंद्र उमेदमल जैन हे बीचकॅण्डी परिसरात राहत असून, हिरे व्यापारी आहेत. त्यांची वांद्रे येथील बीकेसी, भारत डायमंड बोर्समध्ये क्रिएशन्स नावाची एक कंपनी आहे. ही कंपनीत विविध हिरे व्यापाऱ्यांना होलसेलमध्ये हिऱ्यांची विक्री करते.

या व्यवहारातून त्यांची हिरे दलाल असलेल्या अरविंद जैनशी ओळख झाली होती. गेल्या २५ ते ३० वर्षांपासून ते अरविंदच्या परिचित असून त्याच्यासोबत त्याचे अनेकदा हिऱ्यांचा खरेदी-विक्रीचा व्यवहार झालेला आहे.

logo
marathi.freepressjournal.in