मुंबई : गेल्या दोन वर्षांत सुमारे ४५ लाखाच्या तेलाची विक्री करुन व्यापाऱ्याची फसवणूक झाल्याचा प्रकार वरळी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी बबलू संजय साहू, सुरेश रामदुलार गुप्तासह इतर आरोपीविरुद्ध वरळी पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. अल्पेश अरविंद गोग्री यांच्या वरळीतील किराणा मालाच्या दुकानात बबलू नावाचा नोकर तेलविक्रेता सुरेश गुप्ता याला दोन वर्षांपासून मागणीप्रमाणे जास्त माल देत असल्याचे उघडकीस आले. बबलूने सुरेशसह इतरांना सुमारे ४५ लाखांचा माल दिल्याचे उघडकीस आले होते. बबलूने सुरेशसह इतर व्यापाऱ्यांसोबत संगनमत करून ही फसवणूक केली होती. त्यामुळे त्यांनी वरळी पोलिसांना हा प्रकार सांगून संबंधितांविरुद्ध तक्रार केली होती.