हिरे व्यवसायात गुंतवणुकीच्या आमिषाने तिघांची फसवणूक

आरोपीविरुद्ध साकीनाका पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
हिरे व्यवसायात गुंतवणुकीच्या आमिषाने तिघांची फसवणूक

मुंबई : हिरे व्यवसायात गुंतवणुकीच्या आमिषाने तिघांची सुमारे ८१ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार साकीनाका परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी विशाल सुरेश गनवानी या मुख्य आरोपीविरुद्ध साकीनाका पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. हेरंब दत्तात्रय देसाई हे वसई येथे राहत असून, ते साकीनाका येथील एका कॉलसेंटरमध्ये सुपरवायझर म्हणून कामाला आहे. जून २०२२ रोजी त्यांची सायटल इंडिया कंपनीत काम करणाऱ्या विशाल गनवानीशी ओळख झाली होती. त्याने त्यांना हिरे व्यवसायात गुंतवणुकीचा सल्ला दिला होता. यावेळी त्याने खार येथील गनवानी ज्वेलर्समध्ये गुंतवणूक केल्याची माहिती दिली होती.

logo
marathi.freepressjournal.in