४८ लाखांचा अपहार करून कंपनीची फसवणूक

चौकशीत त्याने ४८ लाखांचा अपहार केल्याचे निदर्शनास आले
४८ लाखांचा अपहार करून कंपनीची फसवणूक

मुंबई : सुमारे ४८ लाखांचा अपहार करून जिवाया वेलनेस सेंटर कंपनीची फसवणूक केल्याप्रकरणी मॅनेजर गुरदीपसिंग रघुवीरसिंग मठरू याच्याविरुद्ध सहार पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. गुरदीपसिंगने गेल्या एक वर्षांत ही फसवणूक केल्याचे तपासात उघडकीस आले असून लवकरच त्याची पोलिसांकडून चौकशी होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ असलेल्या वेलनेस सेंटरमध्ये एक स्पा सर्व्हिस सेंटर आहे.

जून २०२१ पासून स्पा सर्व्हिस सेंटरमध्ये गुरदिपसिंग हा मॅनेजर म्हणून काम करत होता. त्याने ग्राहकांकडून घेतलेले पैसे स्वत:च्या क्यूआर कोडवर घेतल्याची तक्रार प्राप्त झाल्यावर याची चौकशी करण्यात आली. या चौकशीत त्याने ४८ लाखांचा अपहार केल्याचे निदर्शनास आले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in