
मुंबई : म्हाडाच्या फ्लॅटसाठी घेतलेल्या पैशांचा अपहार करून मुंबई पोर्ट ट्रस्टमधून निवृत्त झालेल्या एका वयोवृद्धाची सुमारे तीस लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार काळाचौकी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी गणेश प्रकाश चव्हाण या एजंटविरुद्ध काळाचौकी पोलिसांनी फसवणुकीसह अपहाराचा गुन्हा नोंदविला आहे.
६७ वर्षाचे वयोवृद्ध तक्रारदार भायखळा येथे त्यांच्या कुटुंबीयांसोबत राहतात. ते मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये नोकरीस होते, आठ वर्षांपूर्वी ते सेवेतून निवृत्त झाले होते. निवृत्तीनंतर मिळालेल्या पैशांतून त्यांनी दिवा येथे एक फ्लॅट घेतला होता. तिथे इलेक्ट्रीक आणि पाण्याची समस्या असल्याने त्यांनी मुंबईत म्हाडाचा रुम घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. चौकशीदरम्यान त्यांची एजंट असलेल्या गणेश चव्हाणशी ओळख झाली होती. त्याने म्हाडामध्ये २३ मध्ये फ्लॅट मिळवून देण्याचे आश्वासन देऊन त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्याने भायखळा येथे एका व्यक्तीने त्याचा म्हाडाचा फ्लॅट विक्रीसाठी काढल्यो सांगून त्यांच्याकडून पैशांची मागणी केली होती.